File photo 
मराठवाडा

सख्ख्या भावांनीच केला बहिणीचा निर्घृण खून

अलीम शेख

अनाळा (जि. उस्मानाबाद) : दोन गटांत झालेल्या वादातून सख्ख्या भावांनी बहिणीचा गळा चिरून खून केला. ही घटना रोहकल (ता. परंडा) पारधी वस्तीवर रविवारी (ता. २१) सकाळी घडली. गुरुवारी (ता. १८) याच गटांमध्ये झालेल्या वादात चाकूने भोसकल्याने गंभीर जखमी झालेल्या एकाचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे वृत्त समजताच दुसऱ्या गटाने हल्ला करीत कोयत्याने गळा चिरुन महिलेचा निर्घृण खून केला. दरम्यान, मृत दोघेही सख्खे बहीण-भाऊ आहेत.

याबाबत आंबी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहकल येथील पारधी वस्तीवर निवांता बिरक्या शिंदे कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्याच ठिकाणी शेजारी त्याचे मेव्हणे समाधान रामा काळे व त्याचे अन्य चार भाऊ राहतात. गेल्या काही दिवसांपासून जुन्या भांडणावरूण त्यांच्यामध्ये वाद सुरू होता. याच वादातून गुरुवारी काळे व शिंदे कुटुंबांत पुन्हा जोरदार वाद झाला.

या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी निवांता बिरक्या शिंदे व त्याच्या दोन मुलांनी डिगांबर ऊर्फ सुभाष रामा काळे याच्यावर सशस्त्र हल्ला केला. चाकूने वार केल्याने डिगांबर काळे हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना रविवारी सकाळी डिगांबरचा मृत्यू झाला.

पारधी पेढीवर त्याच्या या मृत्यूची माहिती समजताच दोन्ही गटांत पुन्हा वाद सुरू झाला. यावेळी मृत डिगांबर काळे याची सख्खी बहीण व निवांता बिरक्या शिंदे याची पत्नी लाडली निवांता शिंदे (वय ४५) हिचा ऊस तोडण्याच्या कोयत्याने सख्ख्या भावांनीच गळा चिरून निर्घृण खून केला.

कोयत्याने वार केल्याने लाडली शिंदेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी निवांता बिरक्या शिंदे याने आंबी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मृत महिलेचा सख्खा भाऊ समाधान रामा काळे, बाळराज्या रामा काळे, बापूराव रामा काळे, सुधीर रामा काळे व रामा पंड्या काळे (रा. सर्व पारधी पेढी, रोहकल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मृत डिगांबर ऊर्फ सुभाष रामा काळे याचा भाऊ समाधान रामा काळे याने दिलेल्या फिर्यादीवरून निवांता बिरक्या शिंदे याच्याविरोधात आंबी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daughters Property Rights India : …तर मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळणार नाही, नवीन कायदा काय सांगतो?

जुन्या ५०० अन् १००० च्या नोटा पुन्हा बदलून मिळणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

"मी खूप दारू पिऊ लागले" धुरंधर फेम गायिकेने केला व्यसनाधीनतेबद्दल खुलासा "माझ्या पालकांनी माझं मन मोडलं"

Punjab Kings: पंजाब किंग्सचा दबदबा! IPL 2026 मध्ये कोणालच न जमलेला कारनामा श्रेयस अय्यरच्या शिलेदारांनी करून दाखवला

PM Kisan: 23वा हप्ता लवकरच! मात्र या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपये; कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT