केसरजवळगा (ता. उमरगा) : कोरोनापासून बचावासाठी शेतातच वास्तव्य करणारे कुटुंब.  
मराठवाडा

गड्या, आपले शेतच बरे, गाव पडले ओस!

जावेद इनामदार

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक कुटुंबे गावातील घरे सोडून स्वतःच्या शेतात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येत आहे. गावातील सुमारे २५ टक्के कुटुंबे शेतात राहू लागल्याने गावात निरव शांतता असून, गावातील रस्ते ओस पडले आहेत.

कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरी भागातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या लक्षात घेता गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही याचे लोण पसरण्याची शक्यता असल्याने गावखेड्यातील लोकही अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पुणे व मुंबई येथील जवळपास ४४३ नागरिक गावात आल्याने ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांना गावात घेतले जाते. चौदा दिवस घरातच राहण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गावात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात दररोज जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी सरपंच बलभीम पटवारी, ग्रामविकास अधिकारी भास्कर वैराळे, उपसरपंच गुरबस भुरे, ग्रामपंचायत सदस्य जयपालसिंग राजपूत, अझरोद्दीन इनामदार, गजानन पाटील, शरणप्पा कणमुसे, शब्बीर इनामदार, दयानंद कलशेट्टी, सतीश डांगे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शंकर कणमुसे, वैद्यकीय अधिकारी एम. एस. पेठकर, आरोग्यसेविका भिसे, युसूफ गवंडी, श्रीकांत जवळेकर, शैलेश राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक यशवंत बारवकर यांच्यासह पोलिस कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वयंसेविका, शिक्षकांकडून गावात जनजागृती अभियान राबविले जात आहे. 
--------------- 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT