भिकारसांगवी (ता. उमरगा) : लॉकडाऊनमुळे उठाव नसल्याने चार एकरांतील पपईचे पीक रोटाव्हेटर फिरवून मोडीत काढताना शेतकरी.  
मराठवाडा

चार एकर पपईच्या क्षेत्रावर फिरवले रोटाव्हेटर

सकाळ वृत्तसेवा

उमरगा (जि. उस्मानाबाद) : पाण्याची उपलब्धता असल्याने आधुनिक शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेऊन भिकारसांगवी येथील महिला शेतकरी फुलाबाई शंकरराव मोरे यांनी चार एकर क्षेत्रात पपईची शेती केली; मात्र परिपक्व झालेली पपई बाजारपेठेत पाठविण्यासाठी तयारी सुरू असताना लॉकडाऊन झाले आणि गेल्या २५ दिवसांपासून उठाव नसल्याने रोटाव्हेटर फिरवून चार एकर क्षेत्र मोडीत काढले.

कोरोना विषाणू संसर्गामुळे केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने गावासह जिल्हा, परजिल्हा व राज्य सीमा बंद झाल्याने वाहतूक व्यवस्थेसह बाजारपेठा ठप्प झाल्या. यात सर्वाधिक आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांच्या नशिबी आली.

शेतात असलेला माल बाजारपेठेत जाईना. त्यामुळे पदरमोड करून पीकच मोडीत काढावे लागत आहे. भिकारसांगवी येथील फुलाबाई मोरे यांनी चार एकर क्षेत्रात मोठी मेहनत करून पपईची लागवड केली. पपई झाडाला परिपक्वही झाली. मुंबई, पुणे, दिल्ली आणि हैदराबाद येथील बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी दराबाबत व पपईच्या उठावाबाबतची चर्चा सुरू होती.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

साधारणतः आठ ते दहा रुपये प्रतिकिलो दर मिळण्याचे संकेत होते. सर्व जोडणी सुरू असताना कोरोना विषाणूचा संसर्गाच्या भीतीने बाजारपेठा असलेल्या मोठ्या शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले. स्थानिक बाजारपेठत पपईची विक्री होत नाही आणि बाहेरच्या शहरात पाठविण्यासाठी सर्वच मार्ग बंद झाल्याने पिकलेली पपई रानावर पडू लागली.

लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने समोर काहीच पर्याय दिसत नसल्याने जवळपास चाळीस टन उत्पन्न अपेक्षित असलेली चार एकर क्षेत्रावरील पपई ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरने मोडीत काढली. त्यामुळे साडेतीन ते चार लाखांचा आर्थिक फटका बसला, असे श्रीमती मोरे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT