file photo 
मराठवाडा

स्वॅब नमुने तपासणी पुन्हा सोलापूरात होणार

सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या स्वॅबच्या तपासणीबाबत संगीत खुर्ची सुरु असल्याचा प्रकार सुरु आहे. आता स्वॅब तपासणी पुन्हा सोलापूरात होणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील संशयितांच्या स्वॅबचे नमुने सुरवातीला पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात येत होते. त्यानंतर सोलापूर येथे स्वॅब तपासणीची सोय करण्यात आली. उस्मानाबादपासून सोलापूर एका तासाच्या अंतरावर असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, सोलापूर हे भौगोलिकदृष्ट्या वेगळे असल्याने मराठवाड्यातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी मराठवाड्यातच विभागण्यात आले. उस्मानाबाद येथील स्वॅबचे नमुने लातूर येथील विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस येथे तपासण्यास सुरुवात झाली. मागील सहा-सात दिवसांपूर्वीच याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.

केवळ सहा दिवसांत पुन्हा निर्णय बदलण्यात आला आहे. लातूर येथील तपासणीचा वेग आणि तेथे येणारे स्वॅब नमुन्याची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. त्यामुळे लातूर येथील केंद्रावर जास्तीचा ताण पडू लागल्याने उस्मानाबाद येथील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुन्हा सोलापूर येथे पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे स्वब तपासणीबाबत संगीत खुर्चीचा प्रकार अद्याप सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्याच्या स्वॅबचे नमुने तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सध्या तरी अस्तित्वात नाही. सोलापूर येथेही मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असल्याने किमान एक दिवस नमुने तपासणीसाठी थांबावे लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. स्वॅब नमुने पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत अहवाल मिळतील, अशी अपेक्षा स्थानिक प्रशासन करीत आहे. स्वॅब तपासणीच्या संगीत खुर्चीमुळे आरोग्य प्रशासनही चांगलंच हतबल झालंय. 

विद्यापीठ उपपरिसरातील प्रयोगशाळेत तपासणी जूनमध्येच 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसरातील मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र त्यासाठी आवश्यक घटक, प्रयोगाचे साहित्य या बाबी महत्त्वाच्या आहेत. किमान मे महिन्यात तरी येथील तपासणी यंत्रणा कार्यान्वित होईल, याची शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वबची जिल्ह्यातच तपासणीसाठी आता जून महिना उजाडेल असा अंदाज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोयना धरणातून सांडव्यावरील विसर्ग बंद; पायथा विद्युतगृहातून १,०५० क्युसेक पाणी सुरू

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT