oxygen plant oxygen plant
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्तीकडे वाटचाल

जिल्हा रुग्णालयातील एकूण सर्वच टॅंकची क्षमता १३ केएल असून, सद्यःस्थितीत एक टँक प्राप्त झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्णतेकडे जात आहे. काही ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणचे काम सुरू झाले आहे. सर्वच ऑक्सिजन प्लांटचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या १३ केएल लिक्विड ऑक्सिजन टँक (एलएमओ) दाखल झाला आहे. टँक बसविण्याचे काम अंतिम टप्यात आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान मे महिन्यात १४ मे रोजी लिक्विेड ऑक्सिजनची मागणी १९.५ केएल प्रतिदिन इतकी वाढली होती. जिल्ह्याला होणारा ऑक्सिजन पुरवठा हा मुख्यतः पुणे, हैदराबाद सारख्या शहरातून केला जात होता. लिक्विड ऑक्सिजन टँकचे काम येथील जिल्हा रुग्णायलयात सुरू असून, त्याची क्षमता १० केएल आहे. सद्यःस्थितीत हा टॅंक कार्यान्वित आहे. तामलवाडी येथील गोरज गॅसची क्षमता ११ केएल आहे. हा खासगी प्रकल्प सध्या सुरु आहे.

जिल्हा रुग्णालयातील एकूण सर्वच टॅंकची क्षमता १३ केएल असून, सद्यःस्थितीत एक टँक प्राप्त झाला आहे. उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचे कार्यान्वयन १० दिवसांत होणार आहे. तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकची क्षमता १३ केएल असून, त्याची उभारणी सुरू आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत तो कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या सर्व ठिकाणावरून जिल्ह्यास ४७ केएल लिक्विड ऑक्सिजन प्राप्त होणार आहे. या व्यतिरिक्त डयुरा सिलेंडर्स भरण्यासाठी २० केएल क्षमतेचा साठवणूक टँकची प्राथमिक प्रक्रिया सुरु आहे. हवेतून ऑक्सिजन तयार करण्याच्या प्रकल्पांची क्षमता कमी असते. मात्र, आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णालयांना जोडणी केलेले हे प्रकल्प महत्त्वाचे ठरतात. या प्रकल्पाच्या उभारणीचे कामही जिल्ह्यात सुरू आहे.

हा प्रकल्प जिल्हा रुग्णालयात सुरू असून, त्याची क्षमता ३०० एलपीएम आहे. उमरग्यातील उपजिल्हा रुग्णालयात हा प्रकल्प सुरू असून, त्याची क्षमता ४२० एलपीएम आहे. परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात (टाटा पावर्स सीएसआर) क्षमता ५०० एलपीएम प्रकल्पाच्या यंत्रसामग्री उभारणीचे काम पूर्ण आहे. केवळ जोडणी व चाचणी घेण्याचे काम बाकी आहे. कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रकल्पाची (अमेरिकन फाउंडेशन) क्षमता ६०० एलपीएम आहे. तर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रकल्पाची क्षमता ५०० एलपीएम असून, एमआयडीसी मार्फत प्रकल्प मंजूर केला आहे. या व्यतिरिक्त पाथ फाउंडेशन व गुगल कंपनीने जिल्हा रुग्णालयाकरिता एक हजार एपीएम क्षमतेचा सीएसआर प्रकल्प मंजूर केला आहे.

खासगी संस्थांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प-
धाराशिव साखर कारखाना (ता. कळंब) येथील प्रकल्प सहा केएल प्रतिदिन तर नॅचरल शुगर लिमिटेड (ता. कळंब) एक केएल प्रतिदिन कार्यान्वित झाले आहेत. रुपामाता अॅग्रोटेक (ता. उस्मानाबाद) एक केएल यंत्रसामग्री प्राप्त असून, २५ जुलै पर्यंत तो कार्यान्वित होत आहे. भैरवनाथ साखर कारखाना (ता. परंडा) येथे दोन केएल यंत्र जोडणी सुरु आहे. कान्हास इंडस्ट्रीज व मेडिकल गॅसेस (ता. उमरगा) येथे सद्यःस्थितीत ५५० सिलेंडर्स/दिन क्षमतेचा प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

Truck Eicher Accident : भरधाव ट्रकची आशरला पाठीमागून धडक; भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, ८ शेळ्या दगावल्या

फक्त ३३ किमी रुंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे कशी जातात?

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT