parbhani parbhani
मराठवाडा

'वारीला परवानगी नाही म्हणजे हिंदूंच्या आस्मितेवर घाला'

राज्यात कोरोना संसर्गामुळे राज्य शासनाने गतवर्षीसह याही वर्षी पंढरपुर येथील आषाढी वारीला परवानगी नाकारली आहे

गणेश पांडे

परभणी: साडेसातशे वर्षाची परंपरा असलेल्या पंढरपुरच्या आषाढी वारीला सलग दुसऱ्या वर्षीही राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. हा तमाम हिंदूंच्या आस्मितेवर घाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने पंढरपूर वारीस परवानगी द्यावी अन्यथा येत्या १७ जुलै रोजी भजन आंदोलन केले जाणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री अनंत पांडे यांनी गुरुवारी (ता.१५) पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात कोरोना संसर्गामुळे राज्य शासनाने गतवर्षीसह याही वर्षी पंढरपुर येथील आषाढी वारीला परवानगी नाकारली आहे. वारीला परवानगी द्यावी अशी मागणी वारकरी लोकांमधून जोर धरू लागली आहे. यासंदर्भात बोलतांना श्री.पांडे म्हणाले, शेकडो वर्षाची पायी वारीची परंपरा मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळातही आबाधित होती. परंतू गेल्या वर्षी पायी वारीची परंपरा खंडीत झाली. वारकऱ्यांच्या मुलभूत अधिकारांवर गदा का आणण्यात येत आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मानाच्या सात पालख्यासोबत साधारणपणे ३५० ते ४०० पालख्या पंढरपुरात दाखल होतात. त्यात केवळ एका पालखीमागे तीन ते चार वारकऱ्यांना वारी करु द्यावी, मानाच्या पालखी सोबत ५०० वाऱ्यांना पायी जाण्याची परवानगी द्यावी, दिवसा अडचण होत असेल तर रात्रीची पायी वारी करू द्यावी आदी मागण्या यावेळी श्री. पांडे यांनी बोलून दाखविल्या. या मागण्या राज्य शासनाने तातडीने पूर्ण करून वारीस परवानगी द्यावी अन्यथा येत्या ता. १७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच सर्व तहसिल कार्यालयासमोर भजन आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारचा निषेध केला जाणार आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

या आंदोलनानंतरही परवानगी न मिळाल्यास ता. २० जुलै रोजी गावागावात प्रति पंढरपुर साकारले जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्र्यंबक महाराज दस्तापूरकर, प्रभु महाराज मोरे, बालासाहेब महाराज मोरे, गोविंद महाराज पोंढे गुरुजी, भगवान महाराज रिडजकर, सुरेश महाराज गायकवाड, सुभाष महाराज उमरेकर, बाळू महाराज उमरीकर, प्रल्हादराव कानडे, बापुराव सूर्यवंशी, तुकाराम दैठणकर, शिवप्रसाद कोरे, सुरेंद्र शहाणे यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav : वर्ल्ड कप जिंकूनही संघातून वगळले गेले... सूर्यकुमार यादवने पहिल्यांदा मन मोकळे केले; म्हणाला, तु्म्ही स्वतःशी प्रामाणिक नसाल...

Nagpur Drought: मोसंबीची झाडे डोळ्यांदेखत ;सरणावर चढताहेत ; लोहारी सावंगा येथे दुष्काळाचा दाह; मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी आसुसले शेतकरी

Uniform Civil Code: समान नागरी कायद्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून समर्थन ;विरोधकांवर रस्त्यावरील आंदोलनांना चिथावणी दिल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : रवींद्र धंगेकरांची चंद्रकांत पाटील यांच्यावर गोकुळ दूध संघातील राजकारणावरून जोरदार टीका

Petrol Diesel Prices Today : पेट्रोल-डिझेल महाग झाले की स्वस्त? महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज इंधनाचे दर किती? पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT