Ghansawangi Nagar Panchayat  esakal
मराठवाडा

घनसावंगीच्या नगराध्यक्षपदी पांडूरंग कथले, उपाध्यक्षपदी शेख

आज घनसावंगी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली.

सुभाष बिडे

घनसावंगी (जि.जालना) : घनसावंगी नगरपंचायतच्या (Ghansawangi Nagar Panchayat) नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडूरंग कथले, तर उपनगराध्यक्षपदी शेख मुमताज शेख कासम यांची दहाविरूध्द सात मतांनी निवड झाली. घनसावंगी येथे नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा, तर शिवसेनेचे सात सदस्य निवडून आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार बुधवार (ता.१६) नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पांडूरंग कथले, तर शिवसेनेकडून (Shiv Sena) रेहानाबी फैय्याजखान पठाण यांच्या लढत होऊन पांडूरंग मुरलीधर कथले यांना दहा तर रेहानाबी फैय्याजखॉ पठाण यांना सात मते मिळाली. तर उपनगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शेख मुमताज शेख कासम तर शिवसेनेकडून जयश्री देशमुख यांच्यातील सरळ लढतीत शेख मुमताज शेख कासम यांना दहा तर जयश्री देशमुख यांना सात मते मिळाली. त्यामुळे नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पांडूरंग कथले तर उपनगराध्यक्षपदी शेख मुमताज शेख कासम यांची दहा विरूध्द सात मतांनी विजय होऊन त्यांच्या निवडींची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निर्‍हाळी यांनी केली. (Pandurang Kathale Elected As Ghansawangi Nagar Panchayat City President)

यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक विघ्नहार राठोड, यशवंत देशमुख, गणेश हिवाळे, राजश्री प्रल्हाद नाईक, शोभा दादाराव गायकवाड, सलीमाबी सय्यद गफूर, शेख जमील शेख रशीद सौदागर, स्मिता मिंलीद काळे, तर शिवसेनेच्या शिवाली देशमुख, अंजना कथले, यादव शहाजीराव देशमुख, उज्वला साळवे, फरहत मुजाहेद खाँ पठाण यांची उपस्थिती होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशेष भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गणेश निर्‍हाळी यांनी काम पाहिले त्यांना मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी सहकार्य केले. सर्व पदाधिकार्‍यांच्या निवडीनंतर जल्लोष साजरा करण्यात आला. (Jalna)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

नवरा असावा तर असा ! बायकोसाठी हार्दिकने पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने राणीसारखं मोठ्या गाडीत बसावं आणि मी.."

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भारताचा भव्य-दिव्य इतिहास रुपेरी पडद्यावर ! संजय लीला भन्साळी आणि केतन मेहतांच्या जय सोमनाथ सिनेमाचं पोस्टर रिलीज

SCROLL FOR NEXT