file photo 
मराठवाडा

परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांचा चक्क पोलिसाकडून अपमान

मारोती नाईकवाडे

पालम ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी संपूर्ण पालममध्ये बुधवारी (ता.पाच) बंद पाळण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात संबंधीत पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर नागरिक शांत झाले. 

पालम शहरातील पोलिस कर्मचारी जगन्नाथ काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप केला जात आहे. सदरील कर्मचाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मोबाईलवरून बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळे शिवप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या असून त्या पोलिस कर्मचारी गुन्हा दाखल करून निलंबित करावे अन्यथ पूढील घटनांना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला होता. 

बाजारपेठ कडकडीत बंद
घटनेमुळे व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद करून घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविला. बाजारपेठ कडकडीत बंद होती. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले. 

कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू
पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक क्लिपच्या माध्यमातून अपशब्द वापरले असून या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

जागेच्या वादावरुन सहा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा 
गंगाखेड : शहरातील डॉ. आंबेडकर नगरपरिषद वसाहतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची नियोजित जागा अशी पाटी व निळा झेंडा लावलेला होता. सदर जागा आमची आहे असा आरोप ॲड. आरती ब्रह्मनाथकर यांनी केला. यामुळे सदर जागेचा नगरपरिषदेच्या वतीने पंचनामा चालू असताना आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केल्याचे आरोप करत सहा जणांवर ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याची घटना (ता.चार) ऑगस्टला घडली. डॉ.आंबेडकर न.प. वसाहत या ठिकाणी मागील पंधरा वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची नियोजित जागेची पाटी व निळा झेंडा लावलेला होता. हा निळा झेंडा व पाटी (ता.एक) जुलै रोजी काढून टाकण्यात आला. या जागेचा पंचनामा करण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी आले असता ॲड. आरती नेताजी ब्रह्मनाथकर व तिच्यासोबत अन्य पाच जणांनी चंद्रमुनी भानुदास साळवे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चंद्रमुनी भानुदास साळवे यांच्या फिर्यादीवरून ॲड. आरती नेताजी ब्रह्मनाथकर व अन्य पाच जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपविभागीय अधिकारी बलराज लांजिले करत आहेत.

- राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

Latest Marathi News Update LIVE : थार आणि कारचा भीषण अपघात, ५०० फूट खोल दरीत कार कोसळली, ६ पैकी ४ जणांचे मृतदेह सापडले, २ अजूनही बेपत्ता

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

SCROLL FOR NEXT