file photo
file photo 
मराठवाडा

परभणी जिल्ह्यात रुग्णांसोबतच कन्टेंटमेंट झोनही वाढले

सकाळ वृत्तसेवा

परभणी : कोरोना विषाणुची बाधा झालेले रुग आढळून आल्याने परभणी जिल्ह्यातील सहा गावासह परभणी शहरातील पाच व गंगाखेड शहरातील तीन कॉलन्या कन्टेंटमेंट झोन म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जाहीर केले आहेत. एकदम इतके परिसर कन्टेंटमेंट करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणुची बाधा झालेले ६७ रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी (ता.२५) एकाच दिवशी तब्बल ३१ रुग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  यात परभणी शहरातील १२, पूर्णा तालुक्यात १०, सेलू तालुक्यात दोन, गंगाखेड तालुक्यात पाच व जिंतूर तालुक्यात दोन कोरोना विषाणु बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६७ झाली आहे. मंगळवारी (ता.२५) रात्री इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले.
दरम्यान, ज्या भागात मंगळवारी रुग्ण सापडले आहेत ते सर्व भाग जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. यात परभणी शहरातील इटलापुर मोहल्ला, त्रिमुर्तीनगर, कारेगाव रोड, नागसेन नगर व नानलपेठ या पाच कॉलन्यांचा समावेश आहे. तसेच परभणी तालुक्यातील कारेगाव हे देखील प्रतिबंधित करण्यात आले आहे. पूर्णा तालुक्यातील कमलापूर, सेलू तालुक्यातील चिकलठाणा व देवगावफाटा हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर केले आहेत. गंगाखेड शहरातील शिवशाही नगर, सिध्दार्थ नगर व यज्ञभूमी हा परिसर नागरीकांच्या येण्या जाण्यासाठी प्रतिबंधिक करण्यात आला आहे. गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी व पिंपरी हे दोन गाव प्रतिबंधित करण्यात आले आहेत असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

या केल्या उपाययोजना
प्रतिबंधीत क्षेत्रातील गावे व कॉलन्या सील करण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवा व जिवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणाऱ्या वस्तूची वाहतुक करणारी वाहने व मनुष्य यांनाच या क्षेत्रात प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाश्यांना या क्षेत्राच्या बाहेर पडण्यास मनाई आहे. सर्व प्रतिबंधीत क्षेत्रात आरोग्य विभागातर्फे सर्व्हेक्षण सुरु आहे.
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी
 

एसटी बस पुन्हा बंद
परभणी जिल्ह्यामध्ये तीन दिवस संचारबंदी लागु करण्यात आल्याने आणि प्रवाशांनी  प्रवासाकडे  पाठ फिरवलेल्याने जिल्ह्यातंर्गत सुरु करण्यात आलेली बससेवा एसटी महामंडळ प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे एसटी वाहतूक बंद केली होती. त्यानंतर पुन्हा तीन दिवसापूर्वी जिल्ह्यात बससेवा सुरु करण्यात आली. मात्र कोरोनाच्या भितीमुळे नागरीक घराबाहेर पडत नसल्याने बस रिकाम्या धावल्या. पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी नागरीकांना माहिती होताच ते प्रवासासाठी बाहेर पडु लागले. परंतु पुन्हा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने जिल्हा प्रशासनाने नागरी क्षेत्रात तीन दिवसाची संचारबंदी लावली आहे. त्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत प्रवाशी मिळणार नाही या भितीपोटी महामंडळाने सुरु केलेली जिल्ह्यातंर्गत प्रवाशी सेवा बंद केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT