परभणी : माणसाच्या अस्तित्वासाठी आणि निसर्गाच्या संतुलनासाठी वन्यप्राण्यांची दिवसेंदिवस घटत जाणारी संख्या ही एक गंभीर समस्या आहे. स्वार्थी वृत्तीची माणसं वन्यप्राण्यांच्या जीवावर उठली आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जैवविविधता अनेक संकटाशी सामोरे जात आहे. परभणी जिल्ह्यातही वन्य प्राण्यासह पक्षांच्या रस्ता अपघाताचे प्रमाण अधिक आहे.
वन्यजीवांची शिकार, विषप्रयोग, त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण, अमाप वाढत चालेली लोकसंख्या, प्रदूषण या सर्व कारणांमुळे नवीन संकट निर्माण झालेलं म्हणजे मानव - वन्यजीव संघर्ष. या संघर्षात मानव नेहमी विजयी ठरलेला आहे. जीव जातोय तो वन्यजीवांचा परभणीत अनेक ठिकाणी शेती आणि खाणकामामुळे वन्यजीवांचे विविध प्रकारचे अधिवास नष्ट झाले आहेत. १२५ कोटीहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या भारतासह महाराष्ट्रात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे एक नवीन समस्या पुढे येऊन वन्यजीवांवर थोपावली गेली, ती म्हणजे वन्यजीव रस्ते अपघात ही समस्या गांभीर्याने लक्षात घेतली, तर भारत देशात दररोज ५५ हजाराहून जास्त मोटार वाहन विभागात वाहनांची नोंदणी होत असते.
यावरून असे अभ्यासल्या गेले आहे की, शासन वन्यजीव संवर्धन, वन व्यवस्थापन, नवीन अभयारण्याची निर्मिती करणे, याविषयी पाऊले उचलत आहे. परंतु व्यापार आणि विकास निर्मितीची दिशा पर्यावरण पूरक होताना दिसत नाही. ही बाब निराशाजनक आहे. वन्यप्राणी दिवसभरात जंगलाजवळच्या ज्या परिसराचा वापर करतात त्याला कॉरिडॉर किंवा मार्गिका असे म्हणतात. माणसांनी संरक्षित आणि न संरक्षित केलेल्या जंगलाची सीमा त्यांना कसी कळणार ? प्राणी अनेक कारणासाठी असे कॉरिडॉर वापरत असतात. या मध्ये मांजर कुळातील प्राणी उदमांजर, रानमांजर मांसभक्षक अन्न, पाण्यांच्या शोधात रोज किमान वीस ते पंचवीस किलोमीटर प्रवास करत असतात.
या दरम्यान ते मानवी वस्ती, द्रुतगती मार्गावर सहजपणे येतात. भौगोलीक परिस्थिती प्रमाणे रस्त्याचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. नेहमी स्थलांतर करणारे प्राणी एकपेक्षा अधिक अधिवासाचा वापर करतात. वन्यजीवांना त्यांच्या हंगामी काळात जास्त प्रमाणात मार्गक्रम करावा लागतो. भरधाव वेगात सुटणाऱ्या वाहनांच्या अपघातात वन्यप्राणी आपला जीव कायमचा गमवून बसतात. दरवर्षी लाखोपेक्षा जास्त प्राण्याचा मृत्यू होतो. ही गांभीर्याने घेणारी बाब आहे. परभणी जिल्ह्यातील परिस्थिती देखील गंभीर आहे. रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्या प्राण्यात सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, पक्ष्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे.
वन्यजीवांच्या संख्येत घट होण्याचा दर रस्ते अपघातामुळे सर्वाधिक आहे. दरम्यान (अन्नसाखळी वर) एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या प्रजातींच्या संख्येत घट होत आहे. यात असंख्य प्रजाती दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत. तर काहींचा समावेश नामशेष प्राण्यांच्या यादीत वर्ग झालेला आहे. राखीव जंगलामध्ये रस्त्याखालून ड्रेनेज किंवा पाईप्स आणि प्लायओव्हर सारख्या मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात झालेली आहे. पण अराखीव जंगल, माळरान गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळून येणाऱ्या वन्यप्राण्यांचे काय होणार ? असा प्रश्न आहे.
राज्य महामार्गावरील वेग मर्यादा कमी करण्यासाठी कार्य करायला हवे. प्राणी निसर्गाची मालमत्ता आहे. त्यांची संवर्धनाची जबाबदारी हे आपले घटनात्मक कर्तव्य आहे. आपल्या सारखेच अस्तित्व असणाऱ्या प्राण्यासाठीही सुरक्षितपणे वाहने चालवण्याची गरज आहे. आणि राखीव नसलेल्या जंगलातही वन्यप्राण्यांसाठी रस्त्या खालून मार्ग काढून द्यावेत.
- अनिल उरटवाड, पक्षीमित्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.