file photo 
मराठवाडा

एक हजार ३१ वाहनांवर पोलिसांची कारवाई

गणेश पांडे

परभणी : कोरोना संसर्गाच्या काळात संचारबंदी व जमावबंदी लागू असतांनाही विनाकारण फिरणाऱ्यावर परभणी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. आजपर्यंत तब्बल एक हजार ३१ वाहन जप्त करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.१७) ७६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

संचारबंदी, लॉकडाऊन काळात कोविड - १९ संसर्गाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना आपल्या तोंडाला रुमाल किंवा मास्कचा वापर करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. तसेच नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय विनाकारण रस्त्यावर फिरण्यासाठी प्रतिबंध केलेला आहे. परंतू लोकांना अद्यापही या आजाराचे गांभीर्य समजलेले दिसत नाही. त्यामुळे पोलिसांना सातत्याने कारवाई करावी लागत आहे. ता. १७ एप्रिल रोजी दिवसभरात पोलिस ठाणे सोनपेठ, पाथरी व गंगाखेड हद्दीत एकूण २५ इसमावर गुन्हे दाखल केले आहेत. हे इसम पायी व त्यांच्या मोटार सायकलने स्वताच्या तोंडावार मास्क अथवा रुमाल न बांधता फिरत होता. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

७२ ठिकाणी बॅरिगेटस 
कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून जमावबंदी आदेश लागू असून ता. १७ एप्रिल रोजी जमावबंदी आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या १०२ आरोपी विरुध्द २३ गुन्हे दाखल केले आहेत. अद्याप पर्यंत जिल्ह्यात एकूण २३६ गुन्हे दाखल असून ६४४ आरोपीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात आली आहे. ता. १७ एप्रिल रोजी विनाकारण फिरणाऱ्या वाहनाविरुध्द कारवाईत ७६ वाहने जप्त केली आहेत. तसेच विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी, तिचाकी व चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून १ हजार ३१ ज्यात ९९५ दुचाकी व ३४ चारचाकी वाहने आहेत ते जप्त करण्यात आली आहेत. गल्ली बोळातून येणाऱ्या वाहनावर नियंत्रण राहण्यासाठी ७२ ठिकाणी बॅरिगेटस लावण्यात आले आहेत.

२६ रिलीफ कॅम्प सुरु
परभणी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत २६ ठिकाणी रिलीफ कॅम्प चालू असून त्यामध्ये परप्रांतिय व राज्यातील स्थलांतरीत कामगार व गरजुंना ठेवलेले आहे. त्यात ४४५ पुरुष, ३०६ महिला २२२ मुले असे एकूण ९७४ स्थलांतरीचा समावेश आहे. त्यांना या रिलीफ कॅम्पमध्येच राहण्याची व जेवणाची सोय स्वंयसेवी संस्था मार्फत उपलब्ध करण्यात आली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT