जालना : शहरातील मस्तगड परिसरात गल्लीतील नागरिकांनी काटेरी फांद्या टाकून बंद केलेले रस्ते.  
मराठवाडा

जालन्यात आता गल्लोगल्ली लॉकडाऊन 

उमेश वाघमारे

जालना - शहरात कोरोना बाधित महिला रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे आता शहरात अनेक ठिकाणी गल्लोगल्लीच लॉकडाऊन करण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेण्यास सुरवात केली आहे. गल्लोगल्ली काटेरी फांद्या टाकून रस्ते बंद केले जात आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ता.२२ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, जालना शहरासह जिल्हात अनेकांकडून या लॉकडाऊनचे उल्लंघन केले जात आहे.

त्यामुळे आतापर्यंत शेकडो जणांवर लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे सतत आवाहन करण्यात येत आहेत.मात्र, तरी देखील जालन्यात रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास तयार नव्हती. मात्र, सोमवारी (ता.सहा) शहरातील एक महिला रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

परिणामी कोरोना विषाणू दारात आल्याने तो घरात येऊ नये, म्हणून आता नागरिक दक्ष झाले आहेत. शहरातील दुःखीनगर परिसर जिल्हा प्रशासनाने सील बंद केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी अनेक गल्ल्या स्वतःहून बंद केल्या आहेत. अनेकांनी गल्लीत प्रवेश करताच्या मार्गावर काटेरी फांद्या, पत्रे लावून गल्लीतील प्रवेश बंद केले आहेत. त्यामुळे शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर गल्लोगल्ली खऱ्याअर्थाने लॉकडाऊन सुरू झाल्याचे चित्र आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: मान्सून जैसे थे! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात हरकतींचा पाऊस; शेतकरी आक्रमक, ऐतवडे खुर्दमधील 182 एकर सुपीक जमीन होणार बाधित

SAFF Women Football: 'त्या' दोन पराभवांचा बदला घेणार? भारतीय महिला फुटबॉल संघासमोर बांगलादेशचे तगडे आव्हान; आजपासून थरार!

Pimpri: उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने;उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

SCROLL FOR NEXT