file photo 
मराठवाडा

गाजावाजा करत परवानगी प्रकिया सुरु केली, अन पहिल्याच दिवशी पट्टा पडला....

प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागातील कारखानदारी सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी देण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. यानुसार आज एमआयडीसीच्या पोर्टलवर उद्योजकांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. तथापि, सोमवारी (ता.२०) सकाळपासूनच या पोर्टलचे अपग्रेडेशन सुरू असल्याने परवानगीची प्रक्रिया ठप्प होती. यामुळे दिवसभरात एकाही कंपनीला परवानगी मिळालेली नसल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

केंद्र सरकारतर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागात कारखानदारी सुरू करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. कंपन्या व कारखान्यांना परवानगीसाठीची नवीन मार्गदर्शक तत्त्वे एमआयडीसीकडे १७ एप्रिलला आल्यामुळे त्याची अंमलबजावणी व त्यानुसार अपग्रेडेशन करण्यासाठी कमी कालावधी मिळाल्याने ही परवानगीची प्रक्रिया थांबली होती.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन एमआयडीसी, शेंद्रा एमआयडीसीत ५ हजार आठशेहून जास्त कंपन्या आहेत. त्यापैकी केवळ जीवनावश्‍यक वस्तू निर्मिती करणाऱ्या ५४७ कंपन्यांना एमआयडीसीने आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. 


आजपासून नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंपन्यांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे ज्यांच्याकडे कच्चा माल, ज्यांना ऑर्डर आल्या आहेत, त्या पाचशेहून अधिक छोटे-मोठ्या उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांची अर्जप्रक्रिया पूर्ण झाली नाही. हे अपग्रेडेशन पूर्ण झाल्यावर वाळूज, शेंद्रा एमआयडीसीतील उद्योगांना परवानगी मिळणार आहे, असे एमआयडीसीतर्फे कळविण्यात आले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अनेकांनी केले मेलवरून अर्ज 

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंपन्यांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच पोर्टलवरून अडचणी येत असल्याने अनेकांनी एमआयडीसीच्या मेलवर अर्ज केले. मात्र, त्यांना पोर्टलवरूनच परवानगी मिळणार असल्याचेही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार मसिआच्या तेराशे सदस्यांपैकी पाचशे ते सहाशे लघुउद्योजकांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. परवानगी मिळाल्यावर हे सर्व उद्योग सुरू होतील. 
- ज्ञानदेव राजळे, अध्यक्ष, मसिआ. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT