latur news 
मराठवाडा

मुख्यमंत्री म्हणाले, ‘शारीरिक अंतर’ हा शब्द वापरू : ‘सकाळ’मधील बातमीची दखल

सुशांत सांगवे

लातूर : सोशल डिस्टन्स (सामाजिक अंतर) हा शब्द चुकीचा आहे, असे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल डिस्टन्स या शब्दाला ‘शारीरिक अंतर’ हा पर्यायी शब्द सुचवला आहे. याचवेळी ‘सामाजिक अंतर हा शब्द वापरून आपल्याला समाजात अंतर पाडायचे नाही’, हा मुद्दाही ठाकरे यांनी ठासून मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल डिस्टन्स हा शब्द न उच्चारता ‘शारीरिक अंतर’, ‘दो गज दूरी’ या शब्दावर ‘मन की बात’मध्ये भर दिला.

‘सकाळ’च्या रविवारच्या (ता. २६) अंकात भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. यात त्यांनी ‘सोशल डिस्टन्स हा चुकीचा शब्द आहे’, असे म्हटले आहे. या बातमीचे ट्विटही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधताना आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’वरून नागरिकांशी चर्चा करताना ‘सोशल डिस्टन्स’ हा शब्द वापरणे टाळले. सोशल डिस्टन्स हा शब्द अस्पृश्यता या अर्थाने वापरला जातो. याचा गांभीयाने विचार झाला पाहिजे, असे डॉ. देवी यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते. शारीरिक अंतर किंवा सुरक्षित अंतर हे शब्द वापरावेत, असेही त्यांनी सुचविले होते.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ठाकरे म्हणाले, सोशल डिस्टन्स हा शब्द वापरणे कितपत योग्य आहे, हे मला माहिती नाही. सामाजिक अंतर असा या शब्दाचा अर्थ होतो. मात्र, समाजात अंतर पडता कामा नये. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून आपल्याला एकमेकांत किमान अंतर ठेवायचे आहे. सामाजिक अंतर नव्हे. अतिमहत्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडल्यानंतर समाजात फिरताना ठराविक अंतर आपल्या प्रत्येकांत असायला हवे. याला शारीरिक अंतर म्हणू किंवा आणखी काही योग्य शब्द असतील तर ते वापरू. पण, मास्क बांधून फिरणे आणि इतर सर्व नियमांचे पालन करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते आपल्याला पार पाडायचेच आहे.

आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे. त्यांनी सामाजिक अंतर दूर करण्यासाठी आपले अख्खे आयुष्य पणाला लावले होते. याबराबेरच आज अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी ‘महाभारत’ या महाकाव्याच्या लेखनाला सुरवात झाली. त्यात राजधर्म शिकवला गेला आहे. तो राजधर्म पंतप्रधानांनी ओळखला, असे मला वाटते. कारण सामाजिक अंतर या शब्दातून जातीभेद अधोरेखित होतो.
- डॉ. गणेश देवी, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच इंधनाचे नवे दर! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल कितीला?

Akola Accident: भीषण अपघातात दाम्पत्याचा अंत; अमरावतीहून मूर्तिजापूरकडे जाताना काळाचा घाला ; तिघेही गंभीर

‘Toxic’च्या इव्हेंटमध्ये मोठा अपघात! स्पीकर स्टँड कोसळला, ४ जण जखमी; यशने थांबवलं भाषण

Marathi News Live Updates : घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात कचऱ्यावर उभं राहून मनसेचं आंदोलन

Bhuleshwar Ganesh Idol Collapse Video : भुलेश्वरमध्ये गणेशमूर्ती कोसळल्याचा VIDEO समोर; मंडळाच्या अध्यक्षांसह दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT