file photo 
मराठवाडा

नांदेड शहरात प्लॅस्टिकमुक्तीची पावले थांबली

प्रमोद चौधरी

नांदेड : स्वतःमध्ये तसेच समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी नवीन वर्षात अनेकजण संकल्प करत असतात. तसाच संकल्प नांदेड वाघाळा महापालिकेनेही केला होता. त्याची अमलबजावणीही केली. परंतु, ही अमलबजावणी केवळ फोटोसेशनसाठी केली की काय? असा प्रश्‍न आता नांदेडकरांना पडत आहे. 

शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने नवीन वर्षाच्या प्रारंभाला प्लॅस्टिकमुक्तीचा नारा दिला होता. ५० मायक्रॉन व त्यापेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना बंदी केली. त्यानुसार कारवाईलाही धडाक्यात सुरुवात झाली होती. या मोहिमेंतर्गत अनेक टन कॅरिबॅग्जही जप्त केल्या होत्या. परंतु, सद्यस्थितीत या मोहिमेची पावले थांबली असून, फेरीवाले, भाजी, फळे विक्रेत्यांसोबतच किराणा दुकानांतूनही सर्रास कॅरिबॅगचा वापर सुरुच आहे. त्यामुळे मोहिमेतील कर्मचाऱ्यांवर संशय येत असल्याचे व्यापाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणा
महापालिकेच्या या उपक्रमाला व्यावसायिकांनीही पाठिंबा दिलेला आहे. आम्ही कॅरिबॅग आता विक्री करीत नाहीत; परंतु महापालिकेचे कर्मचारी आमची कसून चौकशी करून दुकानांची तपासणी करीत आहेत. वास्तविक थेट विक्रेत्यांशी संबंध असलेले अनेक फिरते कॅरिबॅग व्यावसायिक शहरात कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत फेरीवाले, भाजी, फळ विक्रेते तसेच किराणा दुकानदारांना कॅरिबॅगचा पुरवठा होत आहे. हे कर्मचाऱ्यांना दिसू नये याचे आश्‍चर्य आहे, अशा प्रतिक्रियाही व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.

कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची उदासीनता
महापालिका प्रशासन शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी पावले उचलत आहे. परंतु, कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची त्याला उदासीनता दिसून येत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आज शहराच्या कुठल्याही भागात गेले तर प्लॅस्टिक पिशव्यांचे ढीगच्या ढीग दृष्टीस पडल्याशिवाय रहात नाही. याचा परिणाम मोकाट जनावरांच्या आरोग्याशिवाय मानवाच्या आरोग्यही त्यामुळे धोक्यात आले आहे. 

घनकचरा व्यवस्थापनासाठी अडचणीचे
सदरच्या पिशव्या गटारे, नाल्या, मलप्रवाहामध्ये जावून अडकत असल्याने रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त पाणी वाहते. त्याचा मानवी आरोग्यासह वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनीही आता प्लॅस्टिकबॅगचा वापर थांबवून महापालिकेची मोहिम यशस्वी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण प्लॅस्टीक पिशव्या या अविघटनशील असल्याने त्या नष्ट होत नाहीत. त्यामुळे त्यांची विल्हेवाट लावणे घनकचरा व्यवस्थापनासाठी अडचणीचे ठरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : कांदळवन वाचवण्यासाठी मुंबईच्या अंधेरी पश्चिम वर्सोवा परिसरात नागरिकांचे मोठे आंदोलन

SCROLL FOR NEXT