file photo
file photo 
मराठवाडा

मोक्कातील ‘त्या’ आरोपींना पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कॉंग्रेसचे कार्यकर्ते गोविंद कोकुलवार यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अटक पाच आरोपीना औरंगाबाद मोक्का न्यायालयाचे न्यायाधिश श्री. भोसले यांच्या न्यायालयात मंगळवारी (ता. १०) डिसेंबर रोजी हजर केले असता त्यांनी सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. 

इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चौफाळा परिसरातील विणकर कॉलनीत कॉग्रेसचे कार्यकर्ते गोविंद कोकुलवार यांचे संपर्क कार्यालय आहे. ते आपल्या कार्यालयात बसण्यासाठी गेले त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात ते गंभीर जखमी झालेले आहेत. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला, भारतीय हत्यार कायद्यासह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक्षक विजकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांच्य मार्गदर्शनाखाली तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील करीत आहेत. 

हे आहेत आरोपी 

यातील बजरंग उर्फ यौध्दा भिमराव नरवाडे (वय ३६) रा. अंबाळा (ता. हदगाव), राजू देवराव राऊत (वय २३) रा. बारड  (ता. मुदखेड) ह. मु, बेलानगर, नांदेड, गुरूचरणसिंग उर्फ लक्की संपूर्णसिंग गील (वय ३०) रा. अबचलनगर, सय्यद नजीदोद्दीन उर्फ गुड्डू सय्यद मुनीरोद्दीन (वय ३८) रा. आसरा नगर आणि सुभाष मोहण पवार (वय ४२) रा. बरडशेवाळा (ता. हदगाव) यांना अटक केली. हे फरार कुख्यात असलेल्या हरविंदरसिंग उर्फ रिंदा संधु याच्या सांगण्यावरून शहरातील व्यापाऱ्यांना पिस्तुलचा धाक दाखवूनखंडणी उकळत असत. एवढेच नाही तर त्यानी काहीवर गोळीबारसुध्दा केला होता. या पाच आरोपींना मंगळवारी उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी औरंगाबादा न्यायालयसमोर हजर केले असता न्यायाधिश श्री. भोसले यांनी त्यांना सात दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

गुन्हेगारांना सोडणार नाही

शहरात व्यापाऱ्यांना पिस्तुलचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या किंवा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हागारांची धरपकड सुरू केली. त्यामुळे अनेक गुन्‍हेगार जिल्हा सोडून भुमिगत झाले. तर अनेकांना पोलिसांनी अटक केली. त्यातील अनेकजण मोक्काअंतर्गत कारागृहाची हवा खात आहेत. गोविंद कोकुलवार गोळीबार प्रकरणातील पाच जणांना नुकतीच पोलिस कोठडी मिळाली आहे. शहरात गोळीबाराच्या व दुचाकी, मोबाईल चोरीच्या घटनांवर प्रतिबंध आला असून पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. रात्री नाकाबंदी करून संशयीतांना ताब्यात घेण्यात येत आहेत. नांदेडकरांनी निर्भयपणे आपला व्यवहार करावा असे आवाहन केले आहे.

 विजयकुमार मगर, पोलिस अधिक्षक, नांदेड जिल्हा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT