जालना ः बंदोबस्त करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर. (दुसऱ्या छायाचित्रात) आपल्या कुटुंबासह श्री. गौर.  
मराठवाडा

कोरोनाशी मुकाबल्यासोबत गुन्हेगारांचा बीमोड

उमेश वाघमारे

जालना - कोरोना रोखण्यासह कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हेही कोरोनाशी मुकाबल्यासोबत गुन्हेगारांचा बीमोड करण्यासाठी सरसावलेले आहेत. अर्थात, सध्याच्या प्रचंड व्यस्ततेतही जनतेप्रमाणेच कुटुंबाच्याही आरोग्यरक्षणाबाबत ते सजग आहेत.

जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह पोलिस यंत्रणेची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. आरोग्याचा शत्रू कोरोनाप्रमाणे समाजाचे शत्रू असलेल्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर दिवसरात्र कष्ट घेत आहेत. हे करताना सध्या कुटुंबीयांनाही वेळ देणे शक्य नाही.

घरी ७५ वर्षीय वडील प्रभुसिंह गौर, घरातील सदस्य यांच्याशी सध्याच्या धावपळीत संवादही कमी झालेला. दिवसभर ठिकठिकाणी भेटी, कारवाई केल्यानंतर कर्तव्यावरून घरी गेल्यावर कपडे, जवळील वस्तू आधी सॅनिटराईज्ड कराव्या लागतात. अंघोळ केल्यानंतर मग कुठे घरात वावर. सेवानिवृत्त तहसीलदार असलेले वडील प्रभुसिंह यांच्यासोबत सुरक्षित अंतर ठेवून मग बोलणे. कुटुंबासोबतही ते पूर्वीप्रमाणे मिसळत नाहीत. विशिष्ट अंतर ठेवून परस्परांशी चर्चा होते. सध्याच्या स्थितीत तेही अनेकदा शक्य होत नाही.

राजेंद्रसिंह गौर यांना जशी आपल्या कुटुंबाची काळजी असते, तशीच सर्व कुटुंबीय त्यांची काळजी करीत असते. अर्थात, कोरोना रोखण्यासह समाजकंटकांचा समाचार घेणाऱ्या राजेंद्रसिंह गौर यांच्याबाबत सहकाऱ्यांप्रमाणेच कुटुंबीयांनाही अभिमान आहेच. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Live Updates Marathi : पंतप्रधानांनी कॅमेराचा नाही, हृदयाचा ॲगल बदण्याची गरज, प्रियंका गांधींची सरकारवर सडकून टीका

Ambegaon Nagapur leopard rescue: नागापूरजवळ विहिरीत पडलेल्या चार वर्षांच्या नर बिबट्याचा थरारक बचाव; वनविभाग व ग्रामस्थांनी दिले जीवदान

Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

Viral Playing XI: रजत पाटीदार कर्णधार, सरफराज-ऋतुराज गायकवाड संघात; सोशल मीडियावरील Playing XI मुळे खळबळ

SCROLL FOR NEXT