file photo 
मराठवाडा

पोलिसांचा उन्हाळा होणार सुसहाय्य !

गणेश पांडे

परभणी : पोलिसांची ड्युटी म्हटल की, अंगावर शहारे आणणारे काम, असे आपल्या सारख्या सर्वसामान्यांना वाटेत. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत २४ तास नागरिकांच्या संरक्षणसाठी उभा राहणारा हा पोलिस स्वतःपेक्षाही कर्तव्यावर अधिक लक्ष देतो. अशा कठीण कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचा उन्हाळा मात्र यंदा कूल - कूल होणार आहे. पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या संकल्पनेतून पोलिस कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात ‘एसी’ (वातानुकूलित यंत्र) दिले जाणार आहेत.

पोलिस कल्याण निधी हा पोलिसांच्या कुटुंबासह त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी वापरला जातो. या पोलिस कल्याण निधीअंतर्गत पोलिस कॅंटिन ही संकल्पना ही समोर आली. मिल्ट्री कॅंटिनच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात पोलिस कॅंटिन उभारण्यात आली आहे. या पोलिस कॅंटिनच्या माध्यमातून पोलिसांना दररोजच्या जीवनात लागणाऱ्या आवश्यक वस्तू सवलतीच्या दरात विक्री केल्या जातात. दिवाळी, दसरा, ईद आदी महत्त्वाच्या सणांसाठी लागणारे साहित्यदेखील या कॅंटिनच्या माध्यमातून दिले जाते. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांचा या कॅंटिनमधूनच खरेदीसाठी ओढा असतो. दरवर्षी या कॅंटिनच्या माध्यमातून जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना सुखसोयीच्या वस्तू कमी दरात उपलब्ध करून दिल्या जातात.

कॅंटिनच्या माध्यमातून कमी दरात उपलब्ध
परभणी जिल्ह्यात उन्हाळ्याचे तापमान ४२ ते ४४ अंशांवर जाते. अशा परिस्थितीत १२ -१२ तास कर्तव्य बजावून घरी परतलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची झोप पूर्ण व्हावी यासाठी या कर्मचाऱ्यांना एसी व कूलर कमी दरात द्यावेत, अशी कल्पना पोलिस अधीक्षकांच्या मनात होती. त्यातूनच पोलिस कॅंटिनच्या माध्यमातून BLUE STAR व WHIRLPOOL कंपनीचे ‘एसी’ अत्यंत कमी दरात विक्रीसाठी आणले आहेत. त्याच बरोबर कूलर, फ्रीज व इतर साहित्यदेखील या कॅंटिनच्या माध्यमातून पोलिसांना कमी दरात मिळत आहे.


बुकिंगला प्रतिसाद
पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यंदा पोलिस कर्मचाऱ्यांसाठी २० एसी व काही कूलर आणले आहेत. त्यांची बुकिंग झाली आहे. परत अजून बुकिंग होत असून अजूनही एसी मागविले जातील.
- योगेश चरकपल्ली, व्यवस्थापक, पोलिस कॅंटिन, परभणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

SCROLL FOR NEXT