File Photo 
मराठवाडा

अत्यावश्यक वस्तुंच्या दरवाढीकडे प्रशानाचे दुर्लक्ष

शिवचरण वावळे

नांदेड: ‘लॉकडाऊन’च्या काळात अन्न धान्यांचा तुटवडा भासणार नाही. शिवाय अत्यावश्यक सेवा सुविधांची कमतरता जाणवू नये अशा सुचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यात दवाखाने, औषधी दुकाने, दूध डेअरी व किराणा दुकाने दिवसभर खुली ठेवण्यात आली आहेत. 

यासोबतच होलसेल किराणा व भुसार मालाची दुकानेही २४ तास खुली ठेवण्याचे व त्याद्वारे लहान मोठ्या दुकानदारांना हवा त्या प्रमाणात भुसार माल उपलब्ध करुन देण्याच्या सुचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. मात्र लॉकडाऊन होताच होलसेल भुसार किराना दुकानदारांनी मालाच्या किमतीमध्ये अव्वाच्या सव्वा दरवाढ केली असल्यामुळे सामान्य ग्राहकांना त्याचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. असे असताना देखील या दरवाढीकडे प्रशानाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

हेही वाचा- लॉकडाऊनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे, कसे? ते वाचाच
त्यावश्यक किराणा साहित्यांची दरवाढ 

रविवारी (ता.११ एप्रिल २०२०) रोजी शहरातील राज कॉर्नर पासून ते शिवाजीनगर, वजिराबाद, जुना मोढा व अण्णा भाऊ साठे परीसरातील काही ठोक व किरकोळ विक्रेत्यांनी गोडेतेल (सोयाबीन), शेगदाना, सुर्यफुल तेल, मुगदाळ, शेंगदाने, तुरदाळ, शिलबंद खाद्यतेल व ब्रॅंडेड गहु आटा अशा अत्यावश्यक किराणा साहित्यांची लॉकडाऊनच्या कालात २५ ते २५ रुपयांनी दरवाढ केल्याचे दिसून आले आहे.   

हेही वाचा-  अन्नधान्याच्या वाटपाकडे ठेवावे लागणार लक्ष
मालाचे दर घसरल्याचा दुकानदारांचा दावा

याविषयी शहरातील काही होलसेल दुकानदारांना लॉकडाऊन दरम्यान झालेल्या दरवाढीबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, आम्हाला सर्वच वस्तु महाग मिळत असल्याने नाविलाजाने दरवाढ करावी लागत असल्याचे सांगितले. तर काही दुकानदारांनी सर्वच वस्तुंचे दर दोन ते तीन रुपयाने स्वस्त झाल्याचेही सांगितले. प्रत्यक्षात मात्र सर्वच खाद्यतेलाच्या किमती पूर्वीपेक्षा कुठे तीन तर कुठे आठ ते दहा रुपयांनी महागल्याचे आढळुन आले आहे.

हेही वाचा- लॉकडाऊनचा परिणाम : नांदेड विभागातील ‘एसटी’चे तीन हजार कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत
खाद्य वस्तुंची टंचाई नाही तरीही दरवाढ

लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात अनेक नागरीकांनी धास्तीने तीन ते सहा महिण्यापर्यंत पुरेल एवढा राशनचा साठा करुन ठेवला आहे. त्यामुळे दुकानदारांनी देखील कळत न कळत मनमानी दरवाढ केल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे बाजारात कुठल्याही खाद्य वस्तुंची टंचाई नाही. सर्वच्या सर्व वस्तु हव्या तेव्हा मिळत असताना लोकांनी राशन भरण्यास घाई केल्याने अनेक वस्तुंची दरवाढ झाल्याचे काही दुकानदारांनी सांगितले. 

असे आहेत दर...
वस्तु -  पूर्वीचे दर - आताचे दर
शेंगदाने - ९० ते ९५ रु. - ११० ते १४० रुपये किलो
तुरदाळ- ९० रु. -  १०० रु. किलो
मुगदाळ- १०० रु. - १२५ रु. किलो
चना दाळ-६० रु. ६५ रु. किलो
गोडेतेल खुले-९० ते रु- ९६-९८ रु. किलो 
शेंगदाना तेल-११०- १४५ रु. किलो 
पाच किलो गहु आटा - १५० - १६० ते १७०
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT