Tuljapur News 
मराठवाडा

पुजाऱ्याचा प्रामाणिपणा, अडीच तोळ्यांचे नेकलेस भाविकास केले परत

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : भाविकांचे अनावधानाने शिध्यामधून आलेले अडीच तोळ्यांचे नेकलेस भाविकास परत देऊन पुजाऱ्याची भाविकाबाबतची प्रामाणिकपणा शनिवारी (ता.२६) पाहायला मिळाली आहे. गाजपूर (ता.धारूर) येथील भाविक महादेव मुंडे यांनी सांगितले की, आमच्या घरातील नातेवाईक तुळजाभवानी मातेच्या दश॔नासाठी आले होते. माझी भाची मीनाक्षी घुले (रा.टाकळी, ता.केज) हिने तिच्या गळ्यातील नेकलेस हरभऱ्याच्या डाळीमध्ये ठेवले होते. आम्ही तुळजाभवानी मातेस नैवेद्यासाठी गेलो. शिद्यामध्ये हरभरा डाळ सोबत आणली होती.

या डाळीमध्ये मीनाक्षी घुले यांनी जे नेकलेस ठेवले होते. हे माझी बहीण सुनंदा लाड (रा. लाडवडगाव, ता.केज) हिला माहितच नाही. सुनंदा लाड हिने डाळ ओतुन आणली आणि डाळीमधील नेकलेस ही पुजारी सोमनाथ अमृतराव यांच्याकडे दिले. आमच्या घरातील सर्व नातेवाईकांना नाही असे लक्षात आल्यानंतर आम्ही शोधाशोध केली. त्यानंतर पुजारी सोमनाथ अमृतराव यांच्याकडे चौकशी केली.

श्री अमृतराव यांनी ठेवलेल्या हरभऱ्याच्या डाळीमध्ये नेकलेस तसेच होते. श्री.अमृतराव यांनी नेकलेस भाविकांना परत केले. पुजारी भाविकांबरोबर किती चांगलेपणाने वागतात हे या घटनेमुळे दिसून येते. शनिवारी आज पुजारी सोमनाथ अमृतराव यांचा अडीच तोळ्याची वस्तु घेतल्यानंतर महादेव उत्तम मुंडे, विष्णू घुले यांनी सत्कार तुळजा भवानी मातेच्या महाद्वारासमोर केला.

पुजारी सोमनाथ अमृतराव यांना सोन्याच्या दागिन्यांची माहिती आम्ही दिली. त्यांनी तात्काळ आम्हाला हे सोने परत दिले. अडीच तोळ्यांचे सुमारे वजन असणारे सोने आम्हाला परत मिळाले. ही बाब आनंददायीच आहे.
- महादेव मुंडे,  भाविक, गाजपूर (ता.धारूर)
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Starlink US Military : इराणने अमेरिकन लष्कराविरोधात केला स्टारलिंकचा वापर? गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Delimitation Bill Opposition : डिलिमिटेशन विधेयकावर काँग्रेसची विरोधकांशी चर्चा; राहुल गांधी, खरगे, सोनिया गांधी घेणार शरद पवार, स्टॅलिन यांची भेट

लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार, सरकार दिलेला शब्द पाळणार; पण कधी? मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : खर्गेंसोबत इंडिया आघाडीचे नेते चेन्नई आणि मुंबईला जाणार

Abhijit Dipke : सरकारची पाच हजारांची मदत तुटपुंजी ,अभिजित दीपके , आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाशी साधला संवाद

SCROLL FOR NEXT