Priority to rail and passenger safety says General Manager Gajanan Mallya in nanded
Priority to rail and passenger safety says General Manager Gajanan Mallya in nanded 
मराठवाडा

रेल्वे व प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य - महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : रेल्वे संपत्ती व प्रवाशी यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत नांदेड विभागातील प्रवाशांच्या मागण्याचा साकारात्मकेतने विचार करणार असल्याचे मत दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी व्यक्त केले. ते शनिवारी (ता. 16) नांदेड दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते. 

दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर त्यांनी नांदेड विभागाची तपासणी दौरा केला. नगरसोल, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा स्थानकाची तपासणी करून तेथील प्रवाशांच्या, विविध संघटनांच्या तसेच रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी चर्चा करून समस्या ऐकून घेतल्या. अनेकांचे निवेदन स्विकारले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी चार वाजता हजुर साहेब रेल्वेस्थानकावर त्यांचे आगमन झाले. त्यांनी फलाट क्रमांक चारची पहाणी करून विविध विकास कामांची पहाणी केली. त्यात काही अधिकची माहिती दिली. तसेच परभणी- मुदखेड या दुहेरीकरणाच्या कामाची पहाणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार असून रेल्वेची सुरक्षाही करण्याचा प्रयत्न करणार आहे. परभणी ते मुदखेड सुरू असलेल्या दुहेरीकरणाचे काम जवळपास 40 किलोमीटर पुर्ण झाले असून येत्या सप्टेंबरपर्यंत उर्वरीत 40 किलोलमिटर काम पुर्ण होईल. विद्यूतीकरणासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव असून ते मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. रेल्वेत वाढत्या चोऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेस्थानकावर जेष्ठ व महिलांना तसेच अपंग प्रवाशांना सोय व्हावी यासाठी कामे सुरू आहेत. नांदेड-मुंबई, नांदेड- पुणे आणि नांदेड- नागपूर या मार्गावर नव्याने गाड्या चालिवण्याची मागणी आहे. परंतु मध्य रेल्वेचे मुंबई व नागपूर स्टेशनवर गाडी घेण्यासाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रेल्वे विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT