Prison Lockedown too much Prosonrs Home Minister Anil Deshmukh Said Maharashtra News  
मराठवाडा

आता राज्यातील कारागृहे झाली लाकडाऊन...कैद्यांची जास्त स्ंख्या

प्रकाश बनकर

औरंगाबाद : राज्यातील सहा विभागांतील ज्या कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत, अशी कारागृहे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी (ता. १९) पत्रकारांना दिली. सोमवारपासून हा नियम लागू होणार असून, यात औरंगाबाद येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहाचासुद्धा समावेश आहे. 

गृहमंत्री देशमुख म्हणाले, ‘‘राज्यातील सहा विभागांतील ज्या-ज्या जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. तिथे हा नियम लागू राहणार आहे. औरंगाबादच्या जेलमध्ये कैद्यांची संख्या जास्त आहे. तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नयेत, म्हणून लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारागृहाच्या ठिकाणी जे पोलिस कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतात. आता तिथे फक्त एका शिफ्टमध्ये पोलिस काम करतील. 

याच ठिकाणी या पोलिसांची राहण्याची जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे एकदा कारागृहाचे गेट बंद झाले तर कोणी कर्मचारी अथवा कैदी आत जाणार नाही. आतील कैदीही बाहेर येणार नाही. यापद्धतीने हे जेल बंद ठेवण्यात येणार आहेत.’’ 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

हर्सूल कारागृहातील अठराशेंपेक्षा जास्त कैदी 
हर्सूल मध्यवर्ती कारागृहात आताच्या परिस्थितीत तब्बल एक हजार ८५० कैदी वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. राज्य सरकारने कैद्यांची मुक्तता करण्याचे आदेश दिल्यानंतर या कारागृहातून ४५ कैद्यांची मुक्तता करण्यात आली आहे. कारागृहात सॅनिटायझरच्या व्यवस्थेसह हात धुण्यासाठीही पाण्याची टाकी आहे. याशिवाय वेळोवेळी कैद्यांची तपासणी केली जात आहे. कारागृहाच्या परिसरात आरोग्य विभागामार्फत फवारणीही केली जात आहे, असे हर्सूल कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT