औंढा नागनाथ : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. औंढा तालुक्यातील सर्व व्यवहार बंद झाले असून जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आता शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकही कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरले आहेत. गुरुवारपासून (ता.दोन) दवाखाने सुरू केले आहेत.
शहरात पंचवीस खासगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत. या सर्वांकडे मिळून दिवसाला सरासरी पाचशे ते सहाशे रुग्ण तपासल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी दवाखाने बंद ठेवली होती. त्यामुळे या सर्वांचा भार सहजिकच शासकीय रुग्णालयावर येत होता. साध्याही आजारासाठी शासकीय रुग्णालय गाठावे लागत होते. येथे असलेली गर्दी लक्षात घेता तासनतास रुग्णांना ताटकळत थांबावे लागत होते.
खासगी दवाखाने सुरू करण्याचे आवाहान
ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर सर्व खासगी डॉक्टरांना दवाखाने सुरू करण्यासंबंधी आवाहान केले होते. तसेच खासगी डॉक्टर असोसिएशन संघटनेची बैठक घेण्यात आली. वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देताना डॉक्टरांना बाधा होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, या बाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर खासगी डॉक्टर संघटनेने त्वरित निर्णय घेतला. त्यानंतर डॉक्टर संघटनेने गाऊन, मास्क, कॅप आदी साहित्य तयार करून घेतले.
रुग्णांना दिलासा मिळाला
तसेच डॉक्टर्स व सहकारी कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तयार करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमानंद निखाडे यांनीही मार्गदर्शन केले. गुरुवारपासून शहरातील सर्व खासगी दवाखाने उघडण्यात आले असून वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
येथे क्लिक करा- दिल्लीतील कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जणांचा समावेश
डॉक्टर संघटनेची प्रशंसा
औंढा येथील खासगी वैद्यकीय संघटनेने यापूर्वी वनीकरण, लसीकरण, पूरग्रस्तांना सहाय्य आदी उपक्रमात सहभाग घेतला आहे. तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी डॉक्टर संघटनेची प्रशंसा केली. कोरोना विरुद्धच्या लढाईत येथील सर्व खासगी वैद्यकीय संघटना सहकार्य करत आहे.
रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर तत्पर
रुग्णांना सुविधा मिळणार असून रुग्णांच्या सेवेसाठी यासाठी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. विलास खरात, डॉ. मुकेश पवार, डॉ. देविदास आडे, डॉ. सत्यनारायण अग्रवाल, डॉ. हरीश रुषी, डॉ. गंगावणे, डॉ. दत्ता सावळे, डॉ. सुकांत संघई, डॉ. अभय देशपांडे, डॉ. गजानन वाशीमकर, डॉ. काझी, डॉ. अभय देशपांडे, डॉ. वैशाली सावळे, डॉ. सीमा देशपांडे, डॉ. विमल बोरा, डॉ. बी. एस. रिसोडकर, डॉ. प्रदीप सोनी, डॉ. मीना बोरा, डॉ. रंगनाथ बेंगाळ, डॉ. ज्योत्स्ना आडे, डॉ. प्रमोद सोनी, डॉ. मारोती धर्माधिकारी, डॉ. मालपाणी, डॉ. बोंडा पुढाकार घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.