मानवत शहरात मोर्चात सहभागी नागरीक 
मराठवाडा

नागरिकत्व कायद्याविरोधात परभणी जिल्ह्यात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

सोनपेठ (जि.परभणी) : केंद्र सरकारने नुकत्याच पास केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी सोनपेठ येथे शनिवारी (ता.२१) बाजार पेठ बंद ठेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, तहसीलदारांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने मंजुर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर मोठ्याप्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. देशभर विविध ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येत आहेत. परभणी जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२०) झालेल्या आंदोलनात तुरळक दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोनपेठ शहरातील बंद व मोर्चास मोठे महत्व आले होते. सकाळपासूनच शहरात पोलिसांनी चौकाचौकात चोख बंदोबस्त लावला होता. मुस्लीम युवकांनी शहरभर फिरत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे सकाळपासूनच बंद ठेवली होती. 

 मोर्चाचे रुपांतर  सभेत
अकरा वाजता टिपु सुलतान चौकात शेकडो मुस्लीम युवक जमा झाले. चौकात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन मोर्चास सुरवात झाली. आंबेडकर चौक, आण्णा भाऊ साठे चौक, शिवाजी चौकातून हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तहसील कार्यालयाच्या गेटवर मोर्चाचे रुपांतर छोटेखानी सभेत झाले. या सभेचे प्रास्ताविक समीयोद्दीन काजी यांनी केले तर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी कदम व मारोती रंजवे यांनी पाठिंबा देणारे भाषण केले. नायब तहसीलदार साहेबराव घोडके यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन येऊन स्विकारले. 

शांततेत मोर्चा
मोर्चा संपल्यानंतर मोर्चेकरी शांततेत परतले. मोर्चा विसर्जित झाल्यानंतर. व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे उघडली. या मोर्चात सोनपेठ नगरपरीषदेचे उपाध्यक्ष दत्तात्रय कदम, माजी जिल्हा परीषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख, नगरसेवक श्रीकांत विटेकर, मारोती रंजवे, शिवाजी कदम, रविंद्र देशमुख, सुशीलकुमार सोनवणे, रामेश्वर पंडीत, बळीराम काटे, भगवान राठोड
काजी समीयोद्दीन काजी, गफार हाफीज, सद्दाम हुसेन, रफिक कुरेशी, अब्दुल रहेमान, जिलानी कुरेशी, उस्मानबाबा कुरेशी, नजीर राज, गौस कुरेशी, सैफुल्ला सौदागर, अजिम शेख, जावेद अन्सारी, नासेर पठाण, खुर्शीद अन्सारी, हाफीज आसोमा, सलमान शेख, बुऱ्हाण शेख, अनिस खुरेशी, खदीर टेलर, हाफेज युसुन, हाफेज मुस्तफा शमीम, सिध्दीक काजी, मंजुर मुल्ला, शेख युनुस, फेरोज शेख जावेद शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम युवक व नागरीक उपस्थित होते. 
या मोर्चासाठी पोलिस निरीक्षक गजानन भातलंवडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण सोमवंशी व सर्व पोलिस सहकाऱ्यासह  नायब तहसीलदार साहेबराव घोडके यांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 


मोर्चात महापुरुषांचे फोटो व सर्व रंगाचे झेंडे 
सोनपेठ येथील मोर्चात सर्व महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज टिपु सुलतान या महापुरुषांच्या प्रतिमा व निळे, हिरवे व भगवे झेंडे घेऊन युवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. विविध घोषणांचे फलक ‘संविधान बचाव’, ‘हम सब एक हैं’, अशा विविध घोषणांचे फलक या मोर्चात होते. एकतेच्या घोषणा देत शांततेत हा मोर्चा पार पडल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. 

राष्ट्रीय महामार्गवर पाऊण तास धरणे 
मानवत: शहरात नागरिकत्व कायद्याच्या विरोधात शनिवारी (ता.२१) भव्य मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गवर पाऊण तास धरणे आंदोलन केले. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तहसील प्रशासनाला मागण्याचे निवेदन दिले. दरम्यान, शहरातील मोर्चा शांततेत पार पडला.

मनवत शहरात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पेठ मोहल्ला भागातील मरकज मशीद येथून मोर्चाला सुरवात झाली. क्रांती चौक, मंत्री गल्ली, पोलिस स्टेशन, बसस्थानक मार्गी मोर्चा सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महाराणा प्रताप चौक येथे पोहचला. मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी  छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व टिपू सुलतान यांच्या प्रतिमेसह नागरिकत्व कायद्याच्या विरोधात फलक घेऊन प्रस्तावित कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून केली. सकाळी अकरा ते पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन केले. 


तहसीलदारांना दिले निवेदन
या वेळी मान्यवरानी मार्गदर्शन केले. यानंतर आंदोलकानी तहसीलदार डी. डी. फुफाटे यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. या वेळी नायब तहसीलदार नकुल वाघुंडे, पोलिस निरीक्षक आर. एन. स्वामी उपस्थित होते. राष्ट्रगीताने या सभेचा समारोप करण्यात आला. आंदोलनात हबीब भडके, प्रा. ए. ए. रिझवान, शहराध्यक्ष शाम चव्हाण, बाबूराव नागेश्वर, डॉ. अंकुश लाड, नगरसेवक जमील सय्यद, अनंत भदर्गे, रहिमभाई , शिवनारायण सारडा, नंदु कुमावत, नियामत खान, लुकमान बागवान आदी सहभागी झाले होते. उपविभागीय पोलिस अधिकारी पी. के. एकबोटे यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक आर. एन. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आंदोलन कालावधीत बसस्थानकात वाहने पोलिस सरक्षंणात उभी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT