file photo
file photo 
मराठवाडा

लॉकडाउनमध्ये हळदीच्या दीड लाख पोत्यांची खरेदी

संजय बर्दापुरे

वसमत (जि. हिंगोली) : लॉकडाउनच्‍या काळात सर्व व्‍यवहार ठप्‍प असताना वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने ई-नाम योजनेतून एक लाख ५९ हजार ३१४ पाते हळदीची ऑनलाइन खरेदी केली. खरीप हंगाम पेरणीच्‍या संकटात शेतकऱ्यांच्‍या मदत मिळाल्याने आर्थिक अडचणी दूर झाल्‍या. ई-नाम योजनेत हळदीची ऑनलाइन खरेदी करणारी राज्‍यातील दुसरी बाजार समती ठरली आहे.

राज्‍यातील सांगलीनंतर वसमतची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्‍याला येलदरी, सिद्धेश्‍वरसह इसापूर धरणाचे पाणी मिळते. त्यामुळे हळदीचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. राज्‍यासह परराज्‍यात व परराष्ट्रात येथील हळद निर्यात होत असल्‍याने व भाव चांगला मिळत असल्‍याने शेतकऱ्यांची वसमत बाजारपेठेला पसंती असते.

हळद विक्रीसाठी आणने कठीण

 हळदीने गजबजलेली बाजारपेठ असताना या वर्षी मात्र कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची परिस्‍थिती उद्‍भवल्‍याने शेतकऱ्यांना हळद बाजारात विक्रीसाठी आणने कठीण बनले होते. यामुळे पेरणीच्‍या तोंडावर खत, बियाणे खरेदी कशी करायची, या चिंतेत शेतकरी होता. 

ई-नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी

परंतु, बाजार समितीचे सभापती राजू पाटील इंगोले, उपसभापती रमेश दळवी, सचिव एस. एन. शिंदे यांच्‍यासह सर्व संचालकमंडळ व सर्व कर्मचाऱ्यांनी योग्‍य नियोजन करीत ई-नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत हळदीची खरेदी सुरू केली. विशेष म्‍हणजे लॉकडाउन काळात शासनाने घालून दिलेल्‍या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

एक लाख ५९ हजार ३१४ पात्‍यांची आवक

सोशल डिस्‍टन्‍सिंगचे तंतोतंत पालन व्‍हावे यासाठी बाजार समितीने ‘माय एपीएमसी’ ॲप बनविले. या ॲपद्वारे एप्रिल व मे या दोन महिन्‍यांत चार हजार शेतकऱ्यांनी एक लाख हळद पोत्‍यांची ऑनलाइन नोंदणी केली. त्यानुसार एकूण एक लाख ५९ हजार ३१४ पात्‍यांची आवक झाली. मागील वर्षी या दोन महिन्‍यात दोन लाख ३९ हजार २९२ पोते आवक झाली होती. मागील वर्षी प्रतिक्‍विंटल साडेसहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता.

ऑनलाइन खरेदी करून मदतीचा हात

 परंतु, या वर्षी जिल्‍हा सीमाबंदी असल्‍याने बाहेर जिल्‍ह्यातील आवक व निर्यात बंद असल्‍याने सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्‍विंटल भाव मिळाला. लॉकडाउन काळात सर्व आर्थिक व्‍यवहार ठप्‍प असताना बाजार समितीने हळदीची ऑनलाइन खरेदी करून मदतीचा हात दिला. हळदीची ऑनलाइन खरेदी करणारी वसमत बाजापेठ दुसरी ठरली आहे.


मोबाइल संदेशाद्वारे मागविला शेतमाल

हळद नोंदणीसाठी बाजार समितीने तयार केलेले ‘माय एपीएमसी’ ॲप डाऊनलोड करावी लागत होते. त्यानंतर बाजार समिती निवडायची, होम स्‍क्रीनवर शेतकरी नोंदणीमध्ये जाऊन नाव, मोबाइल नंबर, गाव, शेतमालाचा तपशील नोंद करून साठवायचा. नोंदणी केलेल्‍या शेतकऱ्यांना बाजार समिती एसएमएस द्वारे बोलवेल तेंव्‍हाच शेतीमाल मार्केट यार्डात आणायचा. एसएमएसद्वारे मिळालेल्या शेतकऱ्यांचीच हळद घेतली जात होती. 

शेतकऱ्यांच्‍या आर्थिक अडचणी सोडवल्‍या

संचालक मंडळाची बैठक घेऊन ई-नाम योजनेंतर्गत हळदीची ऑनलाइन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्‍या सोशल डिस्‍टन्‍सिंगचे पालन करीत शेतकऱ्यांच्‍या आर्थिक अडचणी सोडवल्‍या. या कामी सर्व संचालक मंडळ, व्‍यापारी, कर्मचारी, हमाल यांनी मोलाचे सहकार्य केले.
-राजेश पाटील इंगोले, सभापती, बाजार समिती

 


हळदीची ऑनलाइन खरेदी करू शकलो

खरीपाच्‍या पेरणीसाठी खत, बियाणांचा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा होता. अशा आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीत सर्व संचालक मंडळ व व्‍यापारी बांधवांनी सहकार्य केल्‍याने आम्‍ही हळदीची ऑनलाइन खरेदी करू शकलो.
-रमेश दळवी, उपसभापती, बाजार समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT