Latur Crime News esakal
मराठवाडा

Latur | पैशाच्या हिशोबावरून मारहाण, अहमदपुरमध्ये ऊसतोड कामगाराचा मृत्यू

अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आरोपीस अटक

रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील बेलूर येथे पैशाच्या हिशोबावरून झालेल्या हाणामारीत एका ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बेलूर येथील शिवारात मागील आठ दिवसांपासून जवळपास तीस ऊसतोड कामगाराची एक टोळी काम करीत होती. दरम्यान सोमवारी (ता.२८) रात्री आठ वाजता कामगाराच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकमेकांत लाथा, बुक्क्यांनी हाणामारी झाली. अंधार असल्याने कोणाला किती मार लागला याचा अंदाज एकमेकाला आला नाही. नागनाथ सिताराम जाधव (वय ४५, रा.आहेरवाडी, जि.जळगाव) हे गंभीर जखमी झाले. परंतु अंधार असल्याने इतर व्यक्तींना ते शिवारात पडलेले कोणाला दिसले नाहीत. (Quarrel Over Money, Sugar Cutting Worker Died In Ahmedpur In Latur)

मंगळवारी (ता.२९) सकाळी नागनाथ जाधवांना रूग्णालयात घेऊन गेले परंतु उपचारास नेण्यासाठी उशीर झाला व त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात मृताचा पुतण्या मनोज मंगो जाधव यांच्या फिर्यादीवरून देवीदास परशुराम राठोड (वय ३९), दिलीप हरीलाल राठोड ( वय ३०), संदेश देविदास चव्हाण (वय १९, सर्व रा.देवरी ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) यांच्या विरोधात अहमदपूर (Ahmedpur) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आरोपीस अटक केली आहे.

पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी बलराज लंजीले करित आहेत. (Latur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalu Yadav Family Dispute : रोहिणी नंतर आता आणखी तीन बहि‍णींनी नाते तोडले, लाल प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह थांबेना

Sharad Pawar: सरसकट पैसे वाटण्यावर हिवाळी अधिवेशनात चर्चा करू: शरद पवार : काँग्रेस संपेल असे वाटत नाही, नेमकं काय म्हणाले?

राज्यात गारठा वाढणार! उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट, तर मुंबई-पुणेही गारठलं; १० जिल्ह्यांना यलो अलर्ट

Capricorn Horoscope 2026: लव्ह लाईफमध्ये चढ-उतार...तर सिंगल व्यक्तींसाठी लग्नाच्या संधी; वाचा तुमचं वार्षिक राशीभविष्य

आजचे राशीभविष्य- 17 नाेव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT