0Crimenews_13 
मराठवाडा

लातूर जिल्ह्यात जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांना अटक, आठ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

हरि तुगावकर

लातूर : दापका (ता.निलंगा) येथील शिवारात निलंगा ते लांबोटा रस्त्यावर एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना अटक केली आहे. यात पोलिसांनी आठ लाख ६७ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी एका विशेष पथकाची नियुक्तीही केली आहे. या विशेष पथकाने दापका शिवारात निलंगा ते लांबोटा जाणाऱ्या रस्त्यावर वसंतराव पाटील यांच्या मालकीच्या शेतात गट नंबर ७६ अ मधील लिंबाच्या झाडाखाली काही लोक पत्त्यावर पैसे लावून तिर्रट जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

रविवारी (ता.२७) पोलिसांनी येथे छापा टाकला. यात बालाजी वसंतराव पाटील (वय ४६, रा. गांधीनगर, निलंगा), अरविंद बाबूराव रणदिवे (वय ७०, रा. लांबोटा), अनिल अच्युतराव पाटील (रा. औंढा), पद्माकर वामन पांचाळ (वय ४५, रा. पांचाळ कॉलनी, निलंगा), प्रदीप रुपगीर गिरी (वय ४४, रा. पांचाळ कॉलनी, निलंगा), शिरीष महादेव स्वामी (वय ४८, रा. दत्तनगर निलंगा), विक्रम सुभाष मोहोळकर (वय ४२, रा.कुंभार गल्ली, निलंगा), विजय व्यंकट जाधव (वय २५, रा. सास्तूर माकणी), गौस इलाही शेख (वय ३५, रा. शिवाजीनगर निलंगा) यांना पोलिसांनी अटक केली. यात दहा जण फरार झाले. पोलिसांनी या छाप्यात २१ हजार १०० रुपये रोख, १६ दुचाकी, एक चार चाकी वाहन, विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण आठ लाख ६७ हजार शंभर रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



लातुरात तिघांना अटक
लातूर शहरातही विशेष पथकाने दोन ठिकाणी मटक्यावर छापा टाकला. यात तिघांना अटक करून ३५ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. येथील कन्हेरी चौकात गंगाराम किशन राठोड (वय ३८, रा.माताजीनगर) हा स्वतःच्या फायद्यासाठी लोकाकडून पैसे घेऊन आकड्यावर कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आला. यात पोलिसांनी एक हजार २० व साडेसहा हजार रुपयांचा एक मोबाईल असा एकूण सात हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच येथील कव्हा रस्त्यावरील हॉटेल साईराज येथे ब्रह्मनाथ अरुण कदम (वय ३२, रा. माताजीनगर), विष्णू मल्हारी मिसाळ (वय २८, रा.साईरोड) हे स्वतःच्या फायद्यासाठी  लोकाकडून पैसे घेऊन मटका खेळत होते. यात पोलिसांनी दोन हजार ९१० रुपये व २५ हजार रुपयांचे मोबाईल असा एकूण २८ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

UPSC Result : वैभव सूर्यवंशीचे मामा होणार IPS, १०२ व्या रँकसह उत्तीर्ण केली UPSC परीक्षा

Mumbai News: वृद्ध आईचा छळ करणाऱ्या मुलाला दणका! घर सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT