Railway  photo
Railway photo 
मराठवाडा

धावत्या रेल्वेत असह्य वेदना, प्रवाशाला मिळाले उपचार 

अनिल जमधडे

औरंगाबाद : नागपूर ते मुंबई नंदीग्राम एक्‍स्प्रेसमध्ये आदिलाबाद ते मुंबईदरम्यान एका तरुण प्रवाशाची प्रकृती बिघडली. रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रवासी संघटनेच्या मदतीने या प्रवाशाला रात्री दहा वाजता उपचार मिळाले. प्रवाशाने उपचार करणाऱ्या डॉक्‍टर आणि प्रयत्न करणाऱ्या सर्वांच धन्यवाद दिले. 

अचानक पोटदुखीचा त्रास 

नंदीग्राम एक्‍स्प्रेसमध्ये सोमवारी (ता. नऊ) रात्री आठच्या सुमारास प्रवासी व्यंकटेश एस. (वय 38) यांना जालना रेल्वेस्थानकावरून गाडी निघाल्यानंतर अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रचंड घाम येत असताना असह्य वेदना होत असल्याने कुटुंबाची चिंता वाढली. कुटुंबातील मुलांनी रडण्यास सुरवात केली. त्यावेळी रेल्वेचे टिकीट तपासणीस आर. बी. मीना यांनी वाणिज्य नियंत्रण कक्षला माहिती देऊन गाडी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर पोचणार असल्याने औरंगाबाद रेल्वेस्थानकावर डॉक्‍टरांना बोलवण्याची विनंती केली.

रेल्वे प्रवाशी सेनेची तत्परता 

नंदीग्राम एक्‍स्प्रेस औरंगाबादला रात्री पावणेदहा वाजता पोचली. मात्र तोपर्यंत डॉक्‍टर उपलब्ध झाले नाही, रेल्वे पुढच्या प्रवासाला निघाली. मात्र श्री. मीना यांनी ही माहिती लासूर येथील रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना दिली. त्यानुसार सोमाणी यांनी घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला देऊन नंदीग्राम एक्‍स्प्रेस उपचारासाठी पाच मिनिटे लासूर स्टेशनवर थांबवण्याची विनंती केली. नियंत्रण कक्षाचे प्रमुख संजय सिंग यांनी तातडीने मान्यता दिली. 

डॉक्‍टरही धावले मदतीला 

रेल्वे लासूर स्टेशनवर येईपर्यंत श्री. सोमाणी यांनी मनीष मुथा यांना माहिती देऊन डॉक्‍टरांना बोलावण्यास सांगितले. नंदीग्राम 10.40 वाजता लासूर स्टेशनला पोचली. तोपर्यंत दोनशेपेक्षा अधिक रुग्णांना मोफत सेवा दिलेले शिवना हॉस्पिटलचे डॉ. रणजित गायकवाड, डॉ. श्री. अबरार शेख हे संपूर्ण औषधांसह रेल्वेस्थानकावर हजर होते. त्यांनी प्रवासी श्री. व्यंकटेश यांच्यावर उपचार केले. विशेष म्हणजे त्यांनी देऊ केलेले पाच हजार रुपये डॉ. गायकवाड यांनी नाकारत रुग्णांची सेवा करणे हेच आमचे कर्तव्य असल्याचे सांगितले. या औषधोपचाराने व्यंकटेश यांचे कुटुंबीय भारावून गेले. उपचारानंतर 10.50 वाजता पुढच्या प्रवासाला रवाना झाली. 
--- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT