कोळेगाव परिसरात पडलेल्या गारा. 
मराठवाडा

भोकरदन तालुक्यातील काही भागात गारपीट : पहा Video

प्रकाश ढमाले

पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) -  भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात रविवारी (ता. १०) दुपारी बेमोसमी पावसाचा शिडकावा झाला. तर कोळेगाव, माळेगाव परिसरात गारपीटही झाली. त्यामुळे शेतात कामे करणारे शेतकरी, ग्रामस्थांची एकच धावपळ झाली. 

पिंपळगाव रेणुकाई परिसरात रविवारी दुपारी अडीच वाजता ढगांची गर्दी होऊन वादळासह बेमोसमी पावसाने काही वेळ हजेरी लावली. सध्या महिलांची सुरू असलेल्या वाळवणाची कामे सुरू असल्याने पावसामुळे त्यांची धांदल उडाली. या पावसाने तळपत्या उष्णतेमुळे मातीचा सुगंध दरवळून गारवा निर्माण झाला होता.

पावसाचे प्रमाण कमी असल्याने मोठे नुकसान झाले नाही.  सध्या खरीप पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे सुरू आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला राहिल्याने रब्बीचा पेरा अधिक राहिला. यामुळे पिकांना पाणीही मोठ्या प्रमाणात देण्यात आले. शिवाय अति उष्णतेमुळे जमिनी कडक पडल्याने नांगरणीसह शेती मशागतीला अडचणी येत आहेत.  पाऊस पडल्यास जमीन भुसभुशीत होऊन कामे वेगात होतील, त्यामुळे पावसाचा शिडकाव्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल.

भोकरदन तालुक्यातील काही गावात गारपीटही झाली. यात कोळेगाव, माळेगाव, रेलगाव, वरूड बुद्रूक, पळसखेडा मुर्तड, देहेड, पिंपळगाव रेणुकाईच्या दक्षिण भागात गारांचा पाऊस झाला. वादळामुळे झाडे कोसळली. गारपिटीमुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT