शेलूद (ता. भोकरदन) : येथील धामना प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. सांडव्यावरून वाहणारे पाणी. 
मराठवाडा

धामनाच्या सांडव्यावरून झुळझुळ पाणी 

कैलास दांडगे

पारध (जि.जालना) -  परिसरात मंगळवारी (ता. १४) जोरदार पाऊस झाल्यामुळे शेलूद (ता. भोकरदन) येथील धामना प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान, पारधसह प्रकल्पाखालील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील धामना धरण परिसरातील वडोद तांगडा, धावडा, शिवना भागात सोमवारी (ता. १३) रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धामना प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी भर पडली. प्रकल्प आता शंभर टक्के भरल्यामुळे मंगळवारी (ता. १४) सांडव्यावरून पाणी पडण्यास सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

धामना प्रकल्पातून अनेक गावांत पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे आता या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पावसामुळे पारध येथील रायघोळ नदीलादेखील पूर आला. 

गेल्यावर्षी याच महिन्यात धामना प्रकल्प तुडुंब भरला होता; मात्र सांडव्याला गळती लागल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. परिसरातील अनेक गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. तर प्रशासनाच्या वतीने प्रकल्पावर जवानांचा पहारा ठेवण्यात आला होता. यंदाही प्रशासनाला दक्ष राहावे लागणार असल्याचे चित्र आहे. धामना प्रकल्प रायघोळ नदीवर आहे. प्रकल्प भरला की पारध परिसरात अनेक गावांत पाणी घुसते. गेल्यावर्षी पारध येथील गणेशवाडी भागात पाणी घुसले होते. त्यामुळे अनेक गावांना दक्षतेचा इशारा संबंधित विभागाकडून देण्यात आला आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT