file photo 
मराठवाडा

सावधान...! मराठवाड्यात पाऊस पुन्हा येणार

कैलास चव्हाण

परभणी : मराठवाड्यात पुढील पाच दिवसात ढगाळ वातावरण राहुन ता.१० व ११ मार्च रोजी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहत काढणीस आलेली पीके सुरक्षीत राहण्याकडे भर द्यावा, असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे.

सध्या काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यातदेखील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहेत. गत डिसेंबर आणि यंदाच्या जानेवारी महिण्यात ढगाळ वातावरणामुळे हरबरा, गहु या पिकांना चांगलाच फटका बसलेला आहे. गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. 

सातत्याने पावसाळी वातावरण  
संपूर्ण हिवाळादेखील अशाच वातावरणात राहीला होता. आता उन्हाळा सुरु झाला तरी, देखील पावसाळी वातावरण सातत्याने निर्माण होत आहे. शनिवारपासून मराठवाड्यात ढगाळ वातावरण तयार झाल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ता.१० मार्च  रोजी औरंगाबाद, बीड, जालना व उस्‍मानाबाद जिल्‍हयात तुरळक ठिकाणी तर ता.१० व ११ मार्च रोजी लातुर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्‍हयात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्‍या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने दिली आहे.

रब्बी पिकांची घाईने काढणी करा
पुढील आठवडयात पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी न केलेल्‍या व काढणीस तयार असलेल्‍या हरभरा पिकाची लवकरात लवकर काढणी व मळणी करून सुरक्षीत ठिकाणी साठवणूक करावी. काढणीस तयार झालेल्‍या गव्‍हाची लवकर काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. सध्‍याच्‍या काळात हळदीची काढणी, हळद
उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. येत्‍या आठवड्यात पावसाची शक्‍यता असल्‍यामुळे हळदीची उघडयावर साठवण करू नये.`काढणीस तयार असलेल्‍या संत्रा, मोसंबी फळांची लवकरात लवकर काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावीत, असा सल्ला या विभागाने दिला आहे.

    
    
    
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT