Rajiv Satav News 
मराठवाडा

महाराष्ट्रातून राहूल गांधींचा 'हा' विश्वासू मोहरा राज्यसभेवर

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोलीचे माजी खासदार अॅड. राजीव सातव यांना राज्यातून काँग्रेसतर्फे राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्‍ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांतून उत्‍साहाचे वातारण निर्माण झाले असून शुक्रवारी (ता.१३) ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सात जागांसाठी २६ मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार (ता. १३) आहे.

संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार; तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन; तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा काही दिवसांपासून रंगत होती. अखेर हिंगोलीचे काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर करताच जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. श्री. सातव हे राहुल गांधी यांच्या यंग बिग्रेडमधील त्‍यांचे निकटवर्तीय मानले जातात. राजीव सातव यांना त्‍यांच्या आई माजी मंत्री रजनी सातव यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे.

युवक काँग्रसचे अध्यक्षपद देखील सांभाळले 

राजीव सातव हे पंचायत समिती सदस्य, जिल्‍हा परिषद सदस्य म्हणून निवडणून आले होते. त्यांनी जिल्‍हा परिषदचे कृषी सभापती पद सांभाळले आहे. तसेच २००९ मध्ये त्यांनी कळमनुरी विधानसभेचे नेतृत्‍व केले. तर २०१४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्‍यांनी अखिल भारतीय युवक काँग्रसचे अध्यक्षपद देखील सांभाळले आहे. दरम्‍यान २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 

काँग्रेसच्या उमेदवारांना हार पत्करावी लागली

यामुळे जिल्‍ह्यात अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत होते. त्यानंतर माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभरावाचा सामना करावा लागला. तसेच कळमनुरी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनाही हार पत्करावी लागली. या पराभवामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला होता.

दरम्‍यान, राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजीव सातव यांना काँग्रेसतर्फे राज्यसभेवर पाठविण्याची तयारी झाली असून, त्‍यांचे नाव यासाठी निश्चीत झाले आहे. ते शुक्रवारी उमेदवारी देखील दाखल करणार असल्याने जिल्‍ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीनं ट्रेनसमोर उडी मारून संपवलं आयुष्य; खिशात सापडली दोन पानी चिठ्ठी, प्रियकराबाबत म्हणाली...

Mumbai Local Train Chaos: अरे ‘उतरायचं कसं?’! दरवाजे न उघडल्याने प्रवासी ट्रेनमध्येच अडकले; दादरमध्ये मोठा गोंधळ, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मंत्री माणिकराव कोकाटेंवरील अटकेची टांगती तलवार कायम; उच्च न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीस नकार

'तू ही रे माझा मितवा' मधील अभिनेत्रीने अचानक सोडली मालिका; तीन महिन्यात दुसऱ्यांदा बदललं पात्र

Nashik Crime : अंगावर १० तोळे सोने अन् रडणाऱ्या ८० वर्षांच्या आजी; नाशिककरांनी दाखवली माणुसकी!

SCROLL FOR NEXT