संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

राजेश नहार खूनप्रकरणी दोघांच्या मुसक्‍या आवळल्या

उमेश वाघमारे

जालना - परतूर येथील व्यापारी राजेश नहार याच्या खूनप्रकरणी दोन संशयितांच्या पोलिसांनी मंगळवारी (ता. 21) रात्री उशिरा मुसक्‍या आवळल्या आहेत. दरम्यान, संशयितांना बुधवारी (ता. 22) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राजेश नहार खून प्रकरणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे चित्र आहे. 

परतूर येथून जालन्याकडे निघालेले परतूर येथील व्यापारी राजेश नहारचा जालना-वाटूर महामार्गावर शिंगाडे पोखरी फाटा परिसरात ता. 11 जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गावठी पिस्तुलाने गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासकामी पोलिसांकडून तीन पथके स्थापन करण्यात आली होती. पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासामध्ये कमालीची गुप्तता पाळली जात आहे. या प्रकरणाच्या तपासकामी दहा दिवस स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परतूर परिसरात तळ ठोकून होते.

दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी (ता. 21) रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेने रघुवीरसिंग चंदूसिंग टाक (रा. परतूर, ता. परतूर, जि. जालना), अरविंद ऊर्फ बाळू भदरगे (रा. अंबा, ता. परतूर, जि. जालना) या दोन संशयितांच्या मुसक्‍या आवळल्या. त्यांना मौजपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान, या दोन्ही संशयितांना बुधवारी (ता. 21) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, अंबादास साबळे, हिरामन फलटणकर, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, संदीप मांटे, विलास चेके यांनी केली. 

खुनाचे कारण अस्पष्ट 

परतूर येथील राजेश नहार याच्या खूनप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असली तर खुनाचे कारण अस्पष्ट आहे. त्यामुळे हा खून नेमक्‍या कोणत्या कारणावरून झाला? यासह गुन्ह्यात वापरलेल्या गावठी पिस्तुलासह अनेक बाबी स्पष्ट होणे बाकी असल्याचे चित्र आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT