Aurangabad News 
मराठवाडा

राशिभविष्य : तुमची रास सिंह, मकर किंवा मीन आहे का... मग येत्या शनिवारी

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिष शास्त्रामध्ये शनिला मोठे महत्त्व आहे. अनेक शनिभक्त शनिशिंगणापूरला येऊन दर्शन घेतात. दर शनिवारी शनीच्या मूर्तीवर तेल वाहतात. पीडा हरणासाठी अजून काय नाना उपाय करतात.

वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनिल गोसावी यांनी शनीच्या सध्याच्या ग्रहदशेबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

ज्योतिषाचार्य अनिल गोसावी म्हणतात, की शनिमहाराज हे सर्व ग्रहांमध्ये न्यायाधीश आहेत. जे चांगले कार्य करतात, त्यांना शनी चांगले फळ देतो. जे वाईट कृत्ये करतात, त्यांना शनी शिक्षा देतो.

ग्रहराज शनिमहाराज हे सूर्य आणि छाया यांचा मुलगा आहेत, अशी श्रद्धा आहे. शनिवार हा शनिमहाराजांचा विशेष दिवस आहे. तसेच यमराज हा शनिमहाराजांचा भाऊ आणि यमुना ही बहीण आहे. तुमची रास सिंह, मकर किंवा मीन असेल, तर येत्या शनिवारपर्यंत तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी खास घडणार आहे. 

सिंह : तुमची आर्थिक वृद्धी होणार आहे. आपण मुळातच एक उत्तम नेतृत्वगुणांचे धनी आहात. भारदस्त व्यक्तिमत्व व सात्विक वृत्ती ही आपली ओळख असते. गेल्या काही महिन्यांत तुम्हाला अनेक कामांमध्ये अडथळे व अपयश आले. परंतु तुम्ही त्यावर मात केलीत. आता मात्र त्यावेळी केलेल्या प्रयत्नांची चांगली फळे तुम्हाला मिळणार आहेत.

या आठवड्याच्या अखेरपर्यंत काही ना काही आर्थिक वृद्धी होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील. तसेच बराचसा ओढा अध्यात्माकडे राहील. अचानक धनलाभाचेही योग आहेत. नोकरी/व्यवसायात वृद्धी होईल. नवीन कल्पना सुचतील. त्या अंमलात येतील व त्यात यशही मिळेल.

मकर : साडेसाती आहे, त्यामुळे अखंड सावधान राहा, असेच म्हणावे लागेल. आपला स्वभाव काहीसा भावनिक असला, तरी धीरगंभीर, शिस्तप्रियही आहे. 
त्यामुळेच कदाचित लोकांचे आपल्याबद्दल प्रचंड गैरसमज आहेत. त्यात साडेसाती आली आहे. त्यामुळे मानसिक क्लेश खूप संभवतात.

कमालीचा एकांतवास जाणवेल. त्यामुळे आपणच शांतता, संयम ठेवावा. जिभेवर पूर्णपणे नियंत्रण ठेवावे. लेखक असाल, तर एखादी सुंदर कलाकृती आपल्याकडून लिहिली जाईल. पती/पत्नीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. कायदा मोडू नका. नाही तर अटक होण्याचे योग आहेत. पण या शनिवारपर्यंत अविवाहितांच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक निर्णयांची भर पडेल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. 

मीन: कोणतेही कारण नसताना आपणाकडून नुकसान होऊ शकते. वास्तविक आपल्याला हुशारी व धूर्तपणा हे गुण मुळातच मिळाले आहेत. त्यामुळे फार नुकसान होणार नाही.

दक्षता घ्या. नोकरी/व्यवसायात दीर्घकालीन एखादी अडचण उभी राहू शकते. आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टरांना निदान होण्यास अडचणी निर्माण होतील. विवाह ठरविताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आपली फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

पण शनिमहाराज हे न्यायाचे पाईक असणाऱ्यांच्या कायम पाठिशी राहिले आहेत. त्यांच्या उपासनेचे चांगले फळ तुम्हाला मिळू शकते. मात्र, कुठल्याही अंधश्रद्धे्च्या आहारी जाऊ नका. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Amit Thackeray: मनसेचे अमित ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त पिकांची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडे करणार नुकसानभरपाईची मागणी!

आमदार यड्रावकरांचे ३१ लाखांचे बील थकीत तरी महावितरणचा कानाडोळा, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडलं; 'स्वाभिमानी'चा गंभीर आरोप

Gachiroli News: गडचिरोलीत वैशाखापूर्वीच वाढला उन्हाचा पारा; भर दुपारी रस्ते सुनसान; उन्हाच्या तिव्रतेमुळे आत्तापासूनच अनेकजण हैराण

SCROLL FOR NEXT