photo 
मराठवाडा

 सोळा हजार विद्यार्थी जिल्हास्तरावर घडवणार विक्रम  

नवनाथ येवले

नांदेड : जिल्ह्यातील इयत्ता पाचवी  व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता.१६) होत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच २०० केंद्रावर १६ हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेचा विक्रम नोंदवणार आहेत. त्या अनुषंगाने कोणत्या विषयाची तयारी करून घेतली तर मुले पास होतील, या दृष्टीने सर्व नियोजन करा, सराव प्रश्नपत्रिका पुन्हा सोडवा. तुम्ही शिक्षक आहात विद्यार्थ्यांना ओळखता. मुलांची बलस्थाने कोणती आहेत त्यावर भर द्या. शिष्यवृत्ती परीक्षेत नांदेड चे नाव झळकले पाहिजे. बोर्डात पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये किमान जिल्ह्याची पंधरा मुले समाविष्ट व्हावीत ,अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केली.

शिष्यवृत्ती परीक्षेची सराव परीक्षा रविवारी (ता. नऊ) जिल्हाभरातील सर्व शाळा स्तरावर घेण्यात आली. या परीक्षेत इयत्ता पाचवी, इयत्ता आठवीला ज्या शाळेचे विद्यार्थी अधिकाधिक पास झाले आहेत. अशा गुणानुक्रमे वर असलेल्या प्रत्येक तालुक्यातील पाचवीच्या तीन व इयत्ता आठवीच्या तीन तसेच कमी गुण प्राप्त झालेल्या शाळांमधील प्रत्येक शाळेतील दोन याप्रमाणे १९२ शिक्षक, संबंधित गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांच्या बैठकीत बुधवारी (ता.१२) मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे बोलत होते. 

शाळानिहाय आढावा 
बैठकीमध्ये शाळा निहाय आढावा घेण्यात आला .शाळेत किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जे अणुत्तीर्ण झाले त्यांची कारणे कोणती, कोणते प्रश्न त्यांना जमले नाहीत, उत्तर लिहिता आले नाहीत. विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी येत्या तीन दिवसात काय करता येईल ,यावर प्रत्येक शिक्षकाने सादरीकरण केले. प्रत्येक घटकातील सोपे काय आहे, कोणत्या प्रश्नात किती भारांश आहे बेरीज-वजाबाकी, चढता-उतरता क्रम, दिनदर्शिका ,कालमापन ,नाणी-नोटा, सोपे गणित याचा अधिक सराव घेण्याची सूचना शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केली.   


 तज्ज्ञांचे मार्गदर्शन  
गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, सुधीर गुट्टे, दत्तात्र्यय मठपती ,विलास आडे, कृष्णकुमार फटाले ,ससाने, राजेंद्र रोटे सुभाष पवणे यांनी सादरीकरण केले. निकाल वाढविणे, अधिकाधिक विद्यार्थी पात्र होतील यासाठी करावयाच्या वेगळ्या नावीन्यपूर्ण प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. यावेळी बुद्धिमत्ता चाचणी या संदर्भात के.डी.जोशी यांनी मार्गदर्शन केले. प्रश्नपत्रिका सोडवताना घ्यावयाची काळजी ,अचूक उत्तर कसे लिहावे याबाबत त्यांनी भरीव सूचना केल्या. धाराशिव शिराळे व शरद पवार यांनी भाषा व गणित विषयाचे मार्गदर्शन केले. 

पुढील कार्यवाहीचा वस्तुपाठ 
पाचवी व आठवीला जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या शाळांमधील शिक्षकांना शिष्यवृत्तीची पुस्तके मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे ,प्रा.के.डी.जोशी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. अत्यंत कमी कालावधीत प्रज्ञाशोध सराव परीक्षा घेऊन निकाल व विश्लेषण करून पुढे करावयाच्या कार्यवाहीचा वस्तुपाठ मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काकडे यांनी घालून दिले. त्याबद्दल प्रशांत दिग्रसकर यांनी त्यांचे आभार मानले व  उपस्थित शिक्षकांचे प्रशासनाच्या वतीने अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी, व्यंकटेश चौधरी यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी कपाळे, नाईकवाडे , विलास ढवळे, प्रकाश गोडणारे, खिल्लारे आदींनी परिश्रम घेतले.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT