logo
logo 
मराठवाडा

विकासकामांसाठी येथे होणार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची ‘मेगा’ भरती

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः महापालिकेने कार्यकारी अभियंता तथा शहर अभियंता विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभागात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने मानधनावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेत मोठ मोठ्या पदांवर असलेले ‘प्रभारी’ पालिकेच्या विविध योजनांना तसेच विकासकामांना गती देण्यास कमी पडत असल्यामुळे सेवानिवृत्तांना संधी दिल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या सर्व कामांचा डोलारा प्रभारी अधिकाऱ्यांवरच असून त्यामध्ये बहुतांश विभागातील प्रमुख पदांवर प्रभारी राज आहे. त्यामध्ये कंत्राटी अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पालिकेने सर्व महत्त्वाच्या पदांवर २५-३० कंत्राटी अधिकारी असून त्यापैकी अनेक विभागांच्या कामकाजांची गती मंदावल्याचे चित्र आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत अपेक्षित गती गाठता येत नसून त्याचे खापर मात्र प्रशासनावर फुटत असल्याचे दिसून येते. 

एका कंत्राटी अभियंत्याला केले सेवेतून कमी
नुकतेच महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी स्वच्छ भारत मिशनच्या एका कंत्राटी अभियंत्यांना अनियमिततेच्या कारणावरून सेवेतून कमी करून पहिला झटका दिला आहे. तर आता कंत्राटी असूनही लागेबांधे जोडून मुजोर झालेल्या, प्रशासनाचीही दिशाभूल करणाऱ्या, वदरहस्त प्राप्त करणाऱ्या काहींना प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. काही कंत्राटी तर लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळवून प्रशासनालादेखील ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही बोलले जाते. सेवानिवृत्तांची भरती झाल्यानंतर अशांना नारळ देण्यात येणार का? हे आगामी काळात दिसून येणार आहे.

महत्त्वाची १५ पदे भरणार..
त्याचाच परिणाम म्हणून महापालिकेच्या विविध विभागांत महत्त्वाची असलेली १५ पदे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून करार पद्धतीने भरण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. शहर अभियंता विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता (स्थापत्य), यांत्रिकी, स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत विभागासाठी शाखा अभियंता, मालमत्ता व्यवस्थापन, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी यासह सहायक आयुक्तांची तीन पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीबरोबरच पालिकेच्या क्रीडा विभागातदेखील सेवानिवृत्त असो अथवा सुशिक्षित, बेरोजगाराची नियुक्ती केल्यास या विभागालादेखील गती येईल.

उपायुक्तांची दोन पदे रिक्त
महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांचे एक, उपायुक्तांची दोन पदेदेखील रिक्त आहेत. पालिकेतून सेवानिवृत्त झालेले उपायुक्त गणपत जाधव यांची पुन्हा उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नगररचना विभागाचे संचालक रवींद्र जायभाये यांच्याकडे एका उपायुक्तपदाचा पदभार आहे. अन्य कुठल्याच विभागात त्या दर्जाचे अधिकारी नसून सर्व कारभार प्रभारीच पाहतात.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT