नांदेड - कोरोनामुळे स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरिकांना देखील आता स्वच्छतेचे महत्व पटू लागले आहे. त्याचबरोबर स्वच्छता आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला झाला आहे. त्यामुळेच पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १७) स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा साडी, चोळी, मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटॉयझर आदी वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या हजारो कुंटुबियांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनास दिले आहेत. त्याचबरोबर कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील काम करत आहेत. जिल्ह्यातील गरिबांना धान्य वाटप ते सॅनिटायझर, मास्क व इतर आवश्यक वस्तूंचे मोफत वाटप कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.
रेशनकार्ड नसणाऱ्यांना किट वाटप
पालकमंत्री चव्हाण यांच्या सूचनेनुसार पदाधिकारी व कार्यकर्ते आपआपल्या परीने गरीब व वंचित माणसांना मदत करत आहेत. श्री. चव्हाण यांच्या पुढाकारातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राशनकार्ड नसणाऱ्या गरीब व्यक्तींना अन्नधान्याची किट मोफत देण्यात येत आहे. कंधार, मुखेड, देगलूर, नायगाव,मुदखेड, अर्धापूर व भोकर तालुक्यातील गरजवंतांना या धान्य किटचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित तालुक्यामध्ये या धान्य किट लवकरच देण्यात येणार आहेत.
नगरसेवक लागले कामाला
दरम्यान, पालकमंत्री चव्हाण यांनी सूचना केल्यानंतर महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवकही आता कामाला लागले आहेत. घरोघरी जावून कोरोनाविषयक जनजागृतीचे काम करण्यासोबत आपापल्या प्रभागात जंतुनाशक औषधांची फवारणी करणे, स्वच्छता करणे आदी कामांसह शासनाच्या धान्य वाटपावर नियंत्रण ठेवणे, गरीब व गरजवंतांना मोफत धान्य, मास्क, सॅनिटायझर आदींचे वाटप करणे याकडे लक्ष देत आहेत.
हेही वाचलेच पाहिजे - तो पुन्हा येणार, मराठवाड्याला भिजवणार
तरोड्यात महिला कामगारांचा सत्कार
शहरातील तरोडा बुद्रुक भागातील नागरिकांना मोफत धान्य तसेच महापालिकेच्या स्वच्छता व सफाई कामगारांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते साडी, चोळी, मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटॉयझर आदी वस्तू देऊन शुक्रवारी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, निलेश पावडे, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर, मंगेश कदम, सखाराम तुप्पेकर, भालचंद्र पवळे, धम्मा कदम, दिलीप डांगे, गोविंद तोरणे, पिंटू लोमटे, श्रीनिवास कदम, शिवराज कांबळे, अरविंद सरपाते, पंढरी कोंढे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.