Revenue team seizes three tractors and a JCB machine for illegally extracting illegal sand from silt at Ashti.jpg 
मराठवाडा

अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रॅक्टर, जेसीबी मशीन ताब्यात; आष्टीत महसूलच्या पथकाची देविनिमगाव शिवारात कारवाई

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (बीड) :  गाळपेरा जमिनीतून बेकायदेशीररित्या अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रॅक्टर व एक जेसीबी मशीन महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. तालुक्यातील देविनिमगाव येथे शनिवारी (ता. 12) तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्त्वाखाली पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
 
हे ही वाचा : मला लाड नको, मला आशीर्वाद हवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

आष्टी तालुक्यात अवैध वाळूउपशाविरुद्ध महसूल विभागाने कंबर कसली असून ठिकठिकाणी गुन्हे दाखल करून दंड वसुलीच्या कारवाया सुरू आहेत. तालुक्यातील देविनिमगाव येथे रियाज शेख यांच्या गाळपेरा जमिनीतून अवैध वाळूउपसा सुरू असल्याची माहिती खब-यांमार्फत तहसीलदार राजाभाऊ कदम यांना प्राप्त झाली होती. 

त्यानुसार कदम यांनी शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, मंडळ अधिकारी इंद्रकांत शेंदूरकर, तलाठी प्रवीण बोरूडे व अरूण जवंजाळ यांच्यासह धाड टाकली असता तीन ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले.

महसूलच्या पथकाने वाळूउपसा करणारी चारही वाहने ताब्यात घेत कडा पोलिस चौकीच्या आवारात आणून लावली आहेत. या प्रकरणी अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी सकाळशी बोलताना दिली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT