file photo
file photo 
मराठवाडा

लसणाने खाल्ला भाव! ; बाजारात 250 रुपये किलोने विक्री

प्रकाश बनकर

औरंगाबाद : लसणाने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. 70 ते 80 रुपये किलोने मिळणाऱ्या लसणाची किरकोळ बाजारात 250 रुपये दराने विक्री होत आहे, तर ठोक बाजारात लसणाला 120 ते 150 रुपयांचा दर मिळत आहे. वाढलेल्या दरामुळे अनेकांच्या घरांत रोजच्या जेवणातून लसण गायब होत असल्याचे चित्र आहे. 

गेल्या आठवड्यापासून लसणाची आवक कमी झाली. त्यामुळे भाव वाढला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. साधारणतः सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात भाजीपाल्याचे दर वाढतात. गेल्या आठवड्यापासून सर्वच भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे याचा परिणाम भाजीपाला घेणाऱ्यांवर झाला आहे. बाजार समितीत लसण किलोमागे 120 रुपयांपासून पुढे विक्री होत आहे. शहरात फेरीवाल्यांकडून किलो मागे 250 रुपये घेतले जात आहेत. 


कांदा 60 रुपये किलो 
बाजार समितीत ठोक बाजारात कांद्याने चांगलाच भाव खाल्ला आहे. बाजार समितीत कांद्याला 60 रुपये किलो भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात हाच कांदा 80 ते 90 रुपये किलोने विक्री होता आहे. यासह कोंथिबीर 15 ते 20 रुपये जुडी, मेथीची पंधरा रुपये जुडी, भेंडी चाळीस रुपये किलोने विक्री होत आहे. गाजर चाळीस रुपये किलो, पत्ता कोंबी 30 रुपये किलो भाव मिळत आहे. हाच भाजीपाला फेरीवाल्याकडून दुप्पट किमतीने विकला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT