Rising corona in Hingoli district has led to a ban on dam agitation and rallies 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात वाढत्या कोरोनामुळे धरणे आंदोलन, सभावर बंदी

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्ह्यातील गर्दी टाळण्याकरीता धरणे, आंदोलने तसेच सभांवर बंदी घालण्यात आल्याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश काढले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा अधिक प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून जिल्ह्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध विषयावर आयोजित होणारी धरणे, तसेच आंदोलने सभा यावर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक व सर्व उपविभागीय अधिकारी, हिंगोली आणि जिल्ह्यातील सर्व संबंधित रुग्णांची विभाग प्रमुखांवर असणार आहे. याबाबय (ता.२०) फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश काढले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना आखण्यात येत असताना जिल्ह्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी धरणे, आंदोलन, सभांवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत अपराध केला असे मानले जाईल व कारवाई प्रस्तावित केली जाईल असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी निर्गमित केले आहेत
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT