जालना शहरातील मामा चौक येथे बॅरिकेड बसविण्यात आले.  
मराठवाडा

अत्यावश्‍यक वाहनांसाठीच आता रस्ते खुले 

उमेश वाघमारे

जालना - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन असताना देखील जालना शहरात दुचाकीसह खासगी चारचाकी वाहनांची वर्दळ सुरूच आहे. त्यामुळे आता पोलिस प्रशासनाकडून शहरातील प्रत्येक चौक सीलबंद करण्यात येत आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्या दुचाक्या आणि खासगी वाहने पोलिस प्रशासनाकडून जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून शहरातील नागरिकांनी रस्त्यावरील गर्दी कमी करावी असे आवाहन करीत आहेत. मात्र, तरी देखील रस्त्यावर दुचाक्या आणि खासगी वाहनांची वर्दळ कमी होण्यास तयार नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना स्टिकर्स देण्यात आले आहेत.

शहरातील प्रत्येक चौक सीलबंद करण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या चौकावर देखील बॅरिकेड्स बसविण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील गल्लीबोळातून फिरणाऱ्या दुचाकी, खासगी वाहनांना आळा घालण्यासाठी शहरातील काही चौकात बॅरिकेड्स बसविण्यात आले असून, काही चौकात बॅरिकेड्स बसविण्याचे काम सुरू आहे.

शहरातील चौक सीलबंद केल्यामुळे आता शहरातील रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या दुचाक्या आणि खासगी वाहनांना आळा बसेल अशी अशा आहे. शहरातील मामा चौक येथे बॅरिकेड्स बसविण्याच्या कामाची पाहणी सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चतुर्भुज काकडे, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश भाले आदींनी केली. 

चौकाचौकात केली जातेय तपासणी 

पोलिस प्रशासनाने अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना स्टिकर्स दिले आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांकडून वाहनधारकांकडे पोलिस प्रशासनाने दिलेल्या स्टिकर्सची पाहणी करून दुचाकी, चारचाकी वाहनांना सोडले जात आहेत. 

शहरात प्रवेश करणारे सर्व चौक सीलबंद करण्यात आले आहेत. तसेच शहरातील प्रत्येक चौकात बॅरिकेड्स बसविण्यात येत असून, तेथे पोलिस कर्मचारी तैनात आहेत. यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांची गर्दी कमी होणार आहे. 
- सुधीर खिरडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, जालना. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकशाही असावी तर अशी! “मत देणार नाही” म्हणणाऱ्या तरुणाला इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी दिलं असं उत्तर की विरोधकही झाले फॅन! Viral Video

Pune News: ‘जलजीवन’चे काम रखडल्याने टंचाईच्या झळा; मेदनकरवाडीकर तहानेने व्याकूळ, खासगी ४०० टँकरचा पाणीपुरवठा अपुरा!

सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मराठी अभिनेत्रीवर आली हॉटेल बंद ठेवण्याची वेळ ! "अजून वर्षही नाही झालं आणि.. "

Ashok Kharat Case : सावधान! पीडित महिलांचे AI व्हिडिओ व्हायरल कराल तर जेलमध्ये जाल; नाशिक एसआयटी चा इशारा

Latur News: ‘भाकरीच्या चंद्राला’आता महागाईचा डाग; ज्वारी ५५ ते ६० रुपये किलो, उत्पादन क्षेत्र घटल्याने हुरडा पार्ट्यांवरही परिणाम

SCROLL FOR NEXT