hingoli photo 
मराठवाडा

पालकांची धावपळ थांबणार: विद्यार्थ्यांना घरपोच मिळणार पुस्तके

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्‍ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना या वर्षी घरपोच पाठ्यपुस्तके वाटप करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून सध्या एक लाख ४६ हजार ५१६ पाठ्यपुस्‍तकांचे संच प्राप्त झाले आहेत. १४ जूनपूर्वी पाठ्यपुस्ताकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्‍के यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता इतर चालू शैक्षणिक वर्षातील सर्व परीक्षा रद्द करून शाळा, महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्या होत्या. आजघडीला जिल्ह्यात ७३ रुग्ण कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. त्यामुळे मे महिना संपला तरी शाळा कधी उघडणार याचे आदेश अद्यापही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले नाहीत. 

पुस्‍तकांचे एक लाख ४६ हजार ५१६ संच

१५ जूनपूर्वी शाळा सुरू होतील की नाही या बाबत पालक व विद्यार्थ्यांत अद्यापही संभ्रम आहे. शाळा कधीही सुरू होवोत मात्र, जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाने हाती घेतले आहे. त्यानुषंगाने मोफत पुस्तके वितरणासाठी मराठी, हिंदी, उर्दू माध्यमाची एक लाख ४६ हजार ५१६ पुस्‍तकांचे संच आले आहेत.

१४ जूनपर्यंत घरपोच पाठ्यपुस्तके

 आलेले पुस्तकांचे संच संबधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून विद्यार्थ्यांना १४ जूनपर्यंत घरपोच पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. तसे नियोजन शिक्षण विभागाने हाती घेतले आहे.


मराठी, उर्दू, हिंदी माध्यमातील पुस्तकांचा समावेश


जिल्ह्यातील पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप केली जातात. त्याअनुषंगाने जिल्ह्याला एक लाख ४६ हजार ५१६ पुस्तकांचे संच उपलब्ध झाले आहेत. यात मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी माध्यमातील पुस्तकांचा समावेश आहे. तसेच यात पहिलीची १८ हजार ७४७, दुसरीची १८ हजार ६८० तिसरीची १८ हजार ७११ चौथी १८ हजार ३५६, पाचवी १८ हजार १७० सहावी १७ हजार ७२४ सातवी १९ हजार ९० आठव्या वर्गासाठी १४ हजार ६५१६ पुस्तके आली आहेत. 

आतापर्यंत ८५ टक्‍के पुस्‍तके आली

दोन दिवसांत पहिली ते आठर्वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्‍तके उपलब्ध झाली आहेत. प्रत्‍येक तालुक्‍याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पोचती केली आहेत. १४ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे घरपोच वाटप केले जाणार आहे. मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाची एकूण एक लाख ४६ हजार ५१६ पुस्‍तकांचे संच उपलब्ध झाले आतापर्यंत ८५ टक्‍के पुस्‍तके आली आहेत.
- संदीप सोनटक्‍के, प्राथमिक शिक्षणाधिकारीह


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

Latest Marathi News Live Update : अशोक खरातला थोड्या वेळातच कोर्टात हजर करणार

RCB vs SRH: विराटची भर मैदानात ईशान किशनसोबत थट्टा, हनवटीला धरून गोंजारलं; Video Viral

डोळ्यांसमोर मुलगा तडफडत होता… लॉक झालेल्या कारमध्ये ३ वर्षांचा चिराग जिवंत जळाला; लग्नाच्या ८ वर्षांनी झालेला मुलगा काळाने हिरावला

SCROLL FOR NEXT