file photo
file photo 
मराठवाडा

विडी कामगारांचे वेतन, आर्थिक मदत बँकेतून करावी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - हातावर पोट असणाऱ्या विडी कामगारांना केलेल्या कामाचे वेतन व अतिरिक्त आर्थिक मदत बँकेमार्फत करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी कामगार नेते प्रदीप नागापूरकर यांनी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. 

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन व संचारबंदी केली आहे. त्याचा श्रमिकांना सर्वात मोठा फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड, देगलूर, धर्माबाद, कुंडलवाडी आदी भागात सुमारे पाच हजार कामगार आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह विडी बनवून करतात. राज्य शासनाने ता. २२ मार्चपासून संचारबंदी केली तर ता. २५ मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन सुरु आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. 

कामगारांवर उपासमारीची वेळ
विडी कामगारांना प्रतिदिन एक हजार विडी वळल्यानंतर १७५ रुपये किमान वेतन मिळते. जिल्ह्यात किशन व्यंकय्या यांचा ‘मजूर’ चांडक उद्योग समुहाचा ‘कोंबडा’ निझामाबाद येथील ‘चारभाई’ आदी विडी उद्योगात हे कामगार काम करीत असतात. विडी व्यवस्थापनाकडून महिन्यात दहा ते बारा दिवस या कामगारांना काम मिळते त्यावरच दर पंधरा दिवसाला वेतन मिळत असते. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे या कामगारांनी केलेल्या कामाचे वेतन मालकांकडेच थकित आहे. वर दररोजचा रोजगारही बुडाला आहे. दुसरीकडे रोजगार करुन चार पैसे कमविण्याची संधीही नसल्याने या कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. 

आर्थिक मदत बँकेमार्फत द्यावी
नोटबंदीच्या काळात याच मालकांनी कामगारांना बँकेमार्फत वेतन अदा केले होते. त्याच धर्तीवर व्यवस्थापनाने कामगारांना केलेल्या कामाचे वेतन व अतिरिक्त आर्थिक मदत बँकेमार्फत कामगारांच्या खात्यावर जमा करावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने उद्योजकांना कराव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर इंडस्ट्रीयल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर, के. के. जांबकर, श्याम सोनकांबळे, गौतम सुर्य, गणेश संदुपटला, लक्ष्मीबाई कोंडापाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दिव्यांग सहाय्यता कक्षाची स्थापना
नांदेड जिल्हयातील सर्व दिव्यांगांना अडचण असल्यास नमुद सहाय्यता कक्षामध्ये संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा नोडल अधिकारी (कोरोना दिव्यांग सहायता कक्ष) सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे. सध्या जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण राज्यात 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यानुसार पुणे दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सुचनेप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात दिव्यांगांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर कोरोना दिव्यांग सहायता कक्षाची स्थापना जिल्हा समाज कल्याण आधिकारी (नोडल अधिकारी) सतेंद्र आऊलवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

पंचायत समितीमध्ये कक्ष कार्यरत
या कक्षात सकाळी पावणेदहा ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत संपर्क करुन आपली तक्रार (सुचना) देऊ शकतात. त्यासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी नांदेड जिल्ह्यात दिव्यांगांच्या शाळा तसेच कर्मशाळेतील कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. हा सहायता कक्ष हा सकाळी पावणेदहा ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्रत्येक तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कार्यरत राहील. त्यामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने सर्व सुचना (तक्रारी) स्विकारल्या जातात, असे माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT