तळणी (जि. जालना) : पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू घेऊन जाणाऱ्या टेम्पोला मंठा तहसीलदारांच्या पथकाने अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, टेम्पोचालकाने तहसीलदारांच्या गाडीला धडक मारुन पलायन केले.
ही घटना बुधवारी (ता. १०) रात्री दहाच्या सुमारास टाकळखोपा ते शिरपुर या पाणंद रस्त्यावर घडली. यात तहसीलच्या पथकाच्या वाहनाचे थोडे फार नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणालाई दुखापत झाली नाही.
पूर्णा नदीपात्रात रात्रीच्या वेळेत चार वाहने अवैधरित्या वाळू भरत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत महसूल प्रशासनाला मिळाली. मंठा तहसीलदार सुमन मोरे, तलाठी नितीन चिंचोले, तलाठी अंदेलवाड व कोतवाल बालासाहेब भुतेकर इंचा ते शिरपुर पाणंद रस्त्यावर जात असताना त्यांना समोरून टेम्पो ( क्र. एम. एच २१ बी.एच. २२६२ ) येताना दिसला.
या टेम्पोस थांबण्यास सांगितले असता, टेम्पो चालकाने गाडी रिव्हर्स घेत तहसीलदारांच्या गाडीला कट मारुन पुढे नेली. या गडबडीत तहसीलच्या गाडीला धक्का लागला. या अरूंद पाणंद रस्त्यावर पुढे अवैधरित्या टेम्पो व त्या मागे महसुलची गाडी पाठलाग करीत गेली. वारंवार आवाहन करूनही वाळुचा टेम्पो थांबवित नव्हता.
थोडयाच अंतरावर टेम्पो चालकाने पाणंद रस्त्यावर हायड्रोलिकद्वारे ट्रॉली उभी करून तहसीलच्या गाडीवर वाळु रिचवली. समोरच वाळुचा मोठा ढिगारा पडल्याने तहसीलची गाडी जागेवर ऊभी राहिली. सदर टेम्पो चालक पसार झाला. या सर्व झटापटीत बाकीची तीन वाहने पसार झाली. त्यांचा शोध घेतला असता तीन वाहन मालक गणेश हरिभाऊ चाटे, प्रल्हाद हरिभाऊ चाटे ( चेअरमन ), अनिल तुकाराम चाटे सर्व राहणार टाकळखोपा ता. मंठा येथील आहेत, असे समजल्याचे सांगण्यात आले.
या वाहनमालकांची चौकशी करून ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अशा आशयाची तक्रार कोतवाल बालासाहेब विठ्ठलराव भुतेकर यांनी पोलीस निरीक्षक मंठा यांना दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.