Marathwada Latur News 
मराठवाडा

बालकांना कोरोनापासून वाचविण्यासाठी हे करा..!

सुशांत सांगवे

लातूर  : तुमच्या घरात लहान मुल असेल तर त्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून यापुढे पालकांना विशेष खबरदारी घ्यावी लागेल. कारण शहरात आजवर चक्क चार बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांबाबत अधिक दक्ष रहायला हवे. मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढेल, असे पदार्थ देण्याबरोबरच आजारी व्यक्तींपासून मुलांना दूर ठेवणे, व्यायाम-योगासने करण्याची सवय लावण्यापर्यंत काळजी घ्यायला हवी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.


मागील तीन महिन्यांत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील बालरोग विभागाने श्वसन संस्थेचे गंभीर विकार असणाऱ्या शंभरहून अधिक बालकांचे यशस्वी उपचार केले आहेत. यातील कोरोनाची लक्षणे असलेल्या 19 संशयित बालकांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये  एकूण 4 बालके कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. यातील एक बालकाला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. पण, सध्या त्याला होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. उर्वरित तीन कोरोना पॉझिटिव्ह बालकांवर संस्थेतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

लसीकरण टाळू नका
कोरोना या आजारात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची जास्त काळजी घ्यायची असली तरी बालगट हाही तितकाच महत्वाचा बनला आहे. कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. कारण लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. कोरोनाची लक्षणे आणि लहान मुलांना होणाऱ्या निमोनिया, बालदमा,  ब्रोंकोलाइटिस अशा इतर आजारांची लक्षणे एकसारखी असतात. त्यामुळे नेहमी सतर्क रहायला हवे. गोवर, टीबी अशा प्रकारचे आजार होऊ नयेत म्हणून ठरवून दिलले लसीकरण (डोस) टाळू नका. कोरोना बरा होतो. पण इतर आजार जीवेघेणे आहेत. त्यामुळे लसीकरण टाळू नका, असे आवाहनही डॉ. मुंदडा यांनी केले.

इकडे लक्ष द्या...

  1. रोगप्रतिकार शक्ती वाढेल अशा पदार्थांचा अन्नात समावेश करा 
  2. सर्दी, ताप असेल तर मुलांजवळ जाताना चेहऱ्याला मास्क बांधा
  3. घरातील ज्येष्ठ नागरिक आजारी असतील तर मुलांची काळजी घ्या मुल घराबाहेर जात असेल तर मास्क बांधा. परत आल्यानंतर मास्क धुवा
  4. मुलांना प्राणायम, सूर्यनमस्काराबरोबरच व्यायामाची सवय लावा


डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे लातूरातील पहिला कोरोनाबाधित बाल रुग्ण वेळेत निदर्शनात आला. त्यामुळे संबंधीत भागात (हडको कॉलनी) कोरोनाचा प्रसार थांबविण्यात यश आले. आजवर तपासणीदरम्यान आढळून आलेल्या 19 संशयित बाल रूग्णांपैकी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. हे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे पालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.’’ दरम्यान, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील बालरोग विभागातील डॉ. किरण भैसारे, डॉ. विकास सोळुंके, डॉ. शीतल भट्टड, डॉ. महेश पाटील, डॉ. असद पठाण यांच्यासह इतर सर्व निवासी डॉक्टर, परिचारिका, कक्ष सेवक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून संस्थेत मुलांवर उपचार केले जात आहेत. 
डॉ. शिवप्रसाद मुंदडा, बालरोग  विभागप्रमुख 

 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT