Chikhlikar sir.jpg 
मराठवाडा

बियाणे - खतांसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या....कोण म्हणाले ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : शेतकऱ्यावंर सतत कोसळणारे अस्मानी संकट त्यातच कोरोना विषाणूजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेली टाळेबंदी यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. राज्यशासनाने खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

शेतकऱ्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष 
निसर्गाच्या लहरीपणाच्या अस्मानी व सुलतानी फटक्यातून शेतकरी सावरत असतांना कोरोना विषाणूजन्य आजाराचा फटका शेतकऱ्यांना बसतांना दिसत आहे. कोरोना विषाणूजन्य आजाराच्या संकटावर मात करतांना राज्यशासनाकडून शेतकऱ्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. येणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन राज्यशासनाने शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुर्नगठन करावे व शेतकर्‍यांना बी-बियाणे, औषधे आणि खतासाठी अनुदान द्यावे अशी मागणी एका पत्राव्दारे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.

मजूरांना गावी पोंहचविण्यासाठी मदत करावी
या सोबतच फळपिकांबरोबर भाजीपाला प्रक्रिया उद्योगांचा विचार करावा. शेतीमालाच्या विक्रीसाठी जिल्ह्याच्या सिमा मोकळ्या कराव्यात. ऊसतोड कामगारांच्या धर्तीवर राज्यात अडकलेल्या मजूरांना त्यांच्या गावी पोंहचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेशीत करावे, अशा मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे शेतकरी अडचणीत
कोरोना विषाणूजन्य आजारामुळे राज्यातील कृषी क्षेत्रापूढे निर्माण झालेल्या अडचणी आणि त्यावर उपाय याबाबत राज्य शासनाने तात्काळ निर्णय घ्यावे कृषी व पणन विभागाच्या नियोजन कारभाराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला झाला असल्याचा आरोप खा.चिखलीकर यांनी केली आहे. लाखाचा पोशींदा असलेल्या शेतकऱ्यांना संकटकाळात राज्य सरकारने दिलासा देण्याची गरज असतांना त्यांच्याकडे पाठ फिरवली जात असल्याचे आपल्या पत्रात खासदार चिखलीकरांनी नमूद केले आहे.

शिवभोजनातून गोड पदार्थाचे वाटप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी शिवभोजनातून मोफत गोड पदार्थाचे वाटप मानस पुरुष बचत गट अंतर्गत डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय परिसरात करण्यात आले. सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या गंभीर आजाराने हजारो जणांना आपला जीव गमवावा लागला. लॉकडाउनच्या परिस्थितीत रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांची अडचण लक्षात घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शिवभोजनातून गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. 

अनेकांची उपस्थितीती
या प्रसंगी नतहसील कार्यालयाचे प्रेमानंद लाठकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लांडगे, ॲड. गौतम सावते, विजय गोडबोले, सुभाष काटकांबळे, सुशांत लांडगे, बाळासाहेब भद्रे, मनोज हटकर, संदेश लांडगे, सिध्दार्थ वाघमारे व शिवभोजन चालक देविदास वाघमारे आदींची उपस्थिती होती. ता. २८ मार्च पासून शिवभोजन लाभार्थ्यांना पाच रुपये शासकीय शुल्क न आकारता कोरोना लॉकडाऊनमुळे मोफत शिवभोजनाचा नागरिकांना लाभ देण्यात येत आहे, असे शिवभोजन चालक देविदास वाघमारे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

SCROLL FOR NEXT