वालसावंगी ः बैलगाडीतून भाजीपाल्‍याची विक्री करताना शेतकरी भगवान कोथलकर. 
मराठवाडा

शेतकऱ्यांची बैलगाडीतून भाजी विक्री 

विशाल अस्वार

वालसावंगी (जि.जालना) - परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीत भाजीपाल्याची लागवड केलेली आहे. कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर ग्राहकीही नाही. त्यामुळे उत्पादक शेतकरी सध्या बैलगाडीतून गल्लोगल्ली जाऊन भाजीपाल्‍याची विक्री करत आहेत. 

सध्या कोरोनाच्या संकटामुळे राज्यात संचारबंदी असून, लॉकडाऊन सुरू आहे. आठवडे बाजारही बंद करण्यात आले असून, व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्‍पादक शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी मोठी अडचण येत आहे. त्‍यामुळे अनेक शेतकरी बैलगाडीतून गल्लोगल्ली जाऊन भाजीपाल्‍याची विक्री करत आहेत. 

येथील पद्मावती धरण परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्‍याची शेती केली जाते. यामध्ये वांगी, कोबी, मेथी, टोमॅटो आदींचा समावेश आहे. पाण्याच्‍या उपलब्‍धतेनुसार भाजीपाला पिकवला खरा; मात्र कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर विक्री ठप्प झाल्‍याने उत्‍पादक अडचणीत सापडले आहेत.

आठवडे बाजारही बंद असल्‍याने आणि शहरी भागात संचारबंदीमुळे जाता येत नसल्‍याने गावातील गल्लीबोळात भाजीपाल्‍याची विक्री करावी लागत आहे. ग्राहकांनाही भाजीपाला द्वारपोच मिळत आहे. 

यंदा पाणी उपलब्ध असल्याने शेतात कोबी लागवड केली. कोबी काढणीवर आली मात्र कोरोनामुळे विक्री करताना अडचण आली. त्यामुळे आता गल्लोगल्ली जाऊन मिळेल त्या भावात विक्री करत आहे. फेकून देण्यापेक्षा दोन पैसे मिळतील हा हेतू आहे. कोरोनामुळे खूप नुकसान सहन करावे लागत आहे. 
-भगवान कोथलकर, 
भाजीपाला उत्पादक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT