file photo 
मराठवाडा

वीज, पर्यावरणाबाबत स्वतंत्र बैठक 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात ट्रान्सफार्मरच्या कमतरतेसह विजेबाबत अनेक तक्रारी आहेत. तसेच गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबतही ठोस उपाय करण्यासोबतच इतर प्रलंबित विषयांसाठी येत्या आठ दिवसांत स्वंतत्र बैठक बोलविण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक
जिल्हा नियोजन नियोजन समितीच्या बैठकीत ते सोमवारी (ता. २७) बोलत होते. या वेळी त्यांनी जिल्ह्यात वाळूची तीव्र टंचाई आहे. यासंदर्भात जिल्‍हाधिकाऱ्यांनी तत्‍काळ उपाययोजना कराव्‍यात. जिल्‍ह्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी पाच कोटी मंजूर, तर अतिरिक्‍त चार कोटींची मागणी करण्यात आली आहे. पाळज येथील श्री गणपती मंदिराच्‍या विकासासाठी श्रीक्षेत्र पाळजला ‘अ’ दर्जा तीर्थक्षेत्रात समावेश करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. प्रत्‍येक आमदारांनी आपापल्‍या विधानसभा मतदारसंघात नव्याने मंजूर झालेल्या २२ पैकी एकाला मंजुरी देण्‍यासाठी तीर्थक्षेत्राचे नाव सूचवावे, असे सांगितले. 

प्रेक्षागृहाची दुरुस्ती होणार
डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृहाच्‍या दुरुस्‍तीसाठी दोन कोटींचे अनुदान महापालिकेला मंजूर केले. जिल्‍हा परिषदेच्‍या परिसरातील जीर्ण झालेल्‍या इमारती पाडून त्‍यानंतर या परिसरात सुसज्‍ज इमारत उभारणे. वजिराबादच्‍या मल्‍टीपर्पज हायस्‍कूल मैदानावर मुंबई, पुणेच्‍या धर्तीवर अडरग्राऊंड पार्किंगची व्‍यवस्‍था निर्माण करणे, ग्रामीण भागातील रुग्‍णांची हेळसांड टाळण्‍यासाठी २१ रुग्‍णवाहिका देण्यात येणार, शहरातील वाहतूक व्‍यवस्‍था सुधारण्यासाठी सिग्‍नल सिस्‍टीम, झेब्रॉ क्रॉसिंग, डाव्‍या बाजूस वळण्‍याच्‍या पट्ट्या व पोलिस कर्मचारी वाढविणे. 

रस्ता दहा फुटाने मोठा करणार
वाहतुकीची समस्‍या दूर करण्‍यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय ते कलामंदिरपर्यंतची शासकीय मालमत्ता संपादित करून दहा फुटांचा रस्‍ता रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित केले आहे. भोकर तालुक्यातील दिवशी येथे कोल्‍हापुरी बंधाऱ्यावर नाविन्‍यपूर्ण योजनेतून स्‍वंयचलित दरवाजे बसविण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या विद्युत समस्‍या कमी करण्‍यासाठी नांदेड येथे हिंगोली, नांदेड, परभणीसाठी स्‍वतंत्र कार्यालय स्थापन करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याबाबतही या वेळी पालकमंत्री म्हणाले. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी त्यांच्या तालुक्यात पाणीटंचाई आराखड्याच्या बैठका घेऊन त्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे ता. दहा फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत. गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी ७७ कोटींचा प्रस्‍ताव शासनाकडे पाठविलेला आहे. त्‍यापैकी १७.७९ कोटींच्‍या प्रस्‍तावास प्रशासकीय मान्‍यता मिळाली आहे. या बाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्‍यात येणार आहे.

विजेच्या प्रश्नासंदर्भात कारवाइ
जिल्‍ह्यातील विद्युत वितरण व्‍यवस्‍थेसाठी ट्रान्‍सफॉर्मर, ऑईल उपलब्‍धता, किटकॅट उपलब्‍धता व उच्‍च दाब, सिंगल फेज, पोल आदी दुरुस्‍ती, विद्युत चोरी आदी संदर्भात तत्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. यासाठी साडेनऊ कोटी निधी प्रस्‍तावित आहे. अतिरिक्त दोन कोटींचा निधीसाठी प्रयत्‍न करण्‍यात येणार. शहरात संवेदनशील भागामध्‍ये सीसीटीव्ही बसविण्‍यासंदर्भात भरीव निधी उपलब्‍ध करून देण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येणार असून यासाठी जिल्‍हाधिकारी, आयुक्‍त, मनपा, पोलिस अधीक्षक यांना निर्देश देण्‍यात आले आहेत. उर्दू घराच्या उद्‍घाटनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्‍यात येईल. यासाठी उर्दू अकॅडमी मुंबई यांच्याकडून आवश्‍यक ती माहिती उपलब्‍ध करून देण्‍यात यावी, असेही पालकमंत्री चव्हाण यांनी आढावा बैठकीत सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction : जडेजाची कॉपी! CSKने उगाच १४ कोटी नाहीत मोजले, प्रशांत वीरचे Six एकदा बघाच... Video Viral

Prithvi Shaw : ती खोटारडी...! पृथ्वी शॉ मुंबई न्यायालयात पोहोचला, सादर केलं प्रतिज्ञापत्र; आता कोणता नवा कांड केला?

कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

VIDEO : 1 मिनिट 43 सेकंदांचा Video थेट भिडतोय हृदयाला..; माकडांसाठी 'आई' बनलीये महिला, पोटच्या पोरांप्रमाणं लावतेय जीव, तुम्हीही व्हाल भावूक

SCROLL FOR NEXT