good aawaj.jpg 
मराठवाडा

Big Breaking : अरे बाप रे..! या शहरात दुसऱ्या दिवशीही गूढ आवाजाची मालिका सुरूच...वाचा येथील लोकांचे काय झाले..

प्रकाश काशीद

परंडा (उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा शहरात  मंगळवारी (ता.२३) दुपारी चार वाजेच्या दरम्यान गूढ आवाज झाला. अचानक होणाऱ्या गुढ आवाजाची मालिका परंडा शहरात दुसऱ्या दिवशीही कायम असल्यामुळे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.
सोमवारी  ता.२२ जुन रोजी सकाळी ११ वाजुन १० मिनिटाला असाच मोठा गूढ आवाज झाला. या आवाजाने घरावरील पञे, खिडक्यांची तावदाने हादरली होती. अशा प्रकारच्या गूढ आवाजाने भूकंप होतो की काय अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झाली आहे. आधीच कोरोना त्यात पावसाची उघडझाप आणि अचानक सुरू झालेल्या गूढ आवाजामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

हा आवाज नेमका कसा अन् का होतो याचे गुढ कायम आहे. भूवैज्ञानिकांनाही या गुढ आवाजाचा उलगडा अद्याप झाला नाही. जमिनी मधून सतत अधूनमधून धडकी भरणारे गुढ आवाज होत आहेत. प्रशासनाने या होणाऱ्या आवाजासाठी भुगर्भ वैज्ञानिंकामार्फत छडा लावावा अशी मागणी नागरीकातून होउ लागली आहे.

पाथरूड येथे दोन वेळा झाला आवाज 
पाथरूड गावालगत देखील मंगळवारी सकाळी ९.१७ मिनिटांनी आणि दुपारी चार वाजेच्या सुमारास गूढ आवाज झाला. त्यामुळे पाथरूड गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गूढ आवाज होण्याचे प्रमाण वाढले 
गेल्या काही वर्षांपासून परिसरातील ५० किलोमीटरपर्यंत गूढ आवाज होण्याचे प्रमाण वाढले आहे. याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. आवाज नेमके कशाचे आहेत. याचा शोध लावण्यात जनतेतीतील भीती कमी करण्यात प्रशासनाला यश आले नाही. आकाश , गुगर्भ की भूपृष्ठावरील आवाज आहेत. हे ही अध्याप स्पष्ट झाले नाही. गूढ आवाजा बाबत अनेकांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. अर्थात तशी चर्चा देखील सुरू झाली आहे. 

बेसुमार पाणी उपसा
बेसुमार पाणी उपसा, पाचशे ते सहाशे फुटापर्यंत कूपनलिका खोदण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा अनेक कूपनलिका खोदताना केवळ कोरडा धुरळाच येतो. दुसरीकडे फेरभरणाची प्रक्रिया होत नाही. पाण्याचा साठा कमी झाल्याने पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे गूढ आवाजाचे प्रकार वाढत असावेत. असाही अंदाज वर्तविला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

Latest Marathi News Live Update : २४ तासांच्या आत पुणे शहरात दोन गोळीबाराच्या घटना

SCROLL FOR NEXT