birudev.jpg 
मराठवाडा

VIDEO : सातशे वर्षांची परंपरा असलेल्या बिरुदेवाच्या यात्रेला यंदा कोरोनाचा फटका

अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा-लातूर मार्गावरील श्री. क्षेत्र बिरुदेव मंदिराची प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी-पाडव्याला संपन्न होणारी यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे अत्यंद साधेपणाने साजरी करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाचे संकट असल्याने सातशे वर्षाची परंपरा असलेल्या यात्रा महोत्सवाला आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील भाविकांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी होती.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार बिरूदेव देवस्थानच्या पुजारी मंडळाने यात्रेला भव्य दिव्य स्वरूप न देता मंदिरात पारंपारिक धार्मिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला.

मंदिरातून अकरा पालख्या प्रतिवर्षी शहरात येतात मात्र यंदा रविवारी (ता.१५) दोनच पालख्या टमटममध्ये  धनगरवाड्यातील देवघरात आणण्यात आल्या. सोमवारी (ता.१६) सांयकाळी धनगरवाड्यातून निघालेल्या श्री. बिरुदेवाच्या दोन पालखी मिरवणुकीत मोजकेच भाविक सहभागी झाले होते.

पालखी मिरवणुक वेशीत आल्यानंतर मानकरी विजयकुमार पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, त्यानंतर ग्रामदैवत श्री.महादेव मंदिराकडे काठी व पालख्या मार्गस्थ झाल्या. पालख्या महादेव मंदिर परिसरात आल्यावर तरुणांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. श्री बिरुदेवाच्या पालख्यांची महादेव मंदिर भेट झाल्यानंतर प्रवेशद्वारावर  पुजारी बांधवानी  येणाऱ्या काळातील पीक - पाण्याची भविष्यवाणी सांगितली. आई - वडिलाची सेवा नित्यनियमाने केली पाहिजे, माणूसकी जपण्याचा धर्म सर्वानी पाळला पाहिजे. रब्बी हंगाम चांगला होईल, शेळ्या- मेंढयांना चांगले दिवस येतील. असा संदेश दिला. महादेव मंदिराजवळच श्रीची आरती करून टमटममधून पालख्या बिरूदेव मंदिराकडे प्रस्थान झाल्या.

बाशिंग चढविण्याचा नेत्रदिपक सोहळा
पालख्या मंदिरात आल्यानंतर पाच सुहासिनी महिलांनी लक्ष्मीची ओटी भरली. त्यानंतर भंडारा आणि लोकराची उधळण व ढोलाचा गजर करीत रात्री आठ वाजता विजापुरहून आलेले बाशिंग बिरुबाच्या मूर्तीवर चढविण्यात आले. या नेत्रदिपक सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. मंगळवारी पहाटे पाच ते सातच्या  छबिना मिरवणुक काढण्यात आली. यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री बिरुदेव पुजारी मंडळ व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: पालघरचा चेहरा-मोहरा बदलणार! ३०० एकरवर वन उद्यान उभारणार; पालकमंत्र्यांनी प्लॅनच सांगितला

Crime: आरजेडीला मत का नाही दिले? आधी वाद घातला, नंतर वृद्धाला क्रूरपणे संपवलं, घटनेनं खळबळ

Jalgaon News : जळगाव महापालिकेत 'भाजप विरुद्ध सर्व'! भाजप वगळता सर्वांशी युती, महाविकास आघाडीचा निवडणुकीसाठी मोठा निर्णय

Jalgaon Cyber Fraud : एकाने गमावले ४.६१ लाख तर, दुसऱ्याने ५.३५ लाख! जळगावात ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकार

IND A vs SA A: रिषभ पंतच्या टीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय, तब्बल ४१७ धावांचं लक्ष्य गाठून मालिकेत बरोबरी

SCROLL FOR NEXT